SHARAD LONKAR

55151 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा 90 विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती

3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख; 55 जणांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 जणांना प्रत्येकी 1 लाख अशी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मुंबई, १७ जुलै, २०२४ : के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (KCMET) ने के.सी. महिंद्रा शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत 90 हुशार, चुणचुणीत विद्यार्थ्यांना एकूण 337 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. दिवंगत के.सी. महिंद्रा यांनी 1953 मध्ये या शिष्यवृत्तीस सुरुवात केली. महिंद्रा ट्रस्टमार्फत दिली जाणारी ही शिष्यवृत्ती म्हणजे व्याजमुक्त कर्ज आहे. उत्कृष्ट शैक्षणिक आणि अभ्यासेतर गोष्टींमध्ये आघाडीवर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील. यात राज पटेल, अस्मिता सूद आणि सावली टिकले यांचा समावेश आहे. राज पटेल प्रिन्स्टन विद्यापीठात फायनान्सचा अभ्यास करणार आहेत; अस्मिता सूद स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोमेडिकल डेटा सायन्स शिकणार आहे आणि सावली टिकले हार्वर्ड विद्यापीठात आर्किटेक्चर अभ्यासणार आहे. 55 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 लाख आणि 32 विद्यार्थ्यांना त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या वर्षीच्या गटातील अपवादात्मक गुणवत्ता आणि प्रतिभा हेरत ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच, मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे. ट्रस्टकडे यंदा एकूण 2,354 अर्ज आले होते. यापैकी 90 विद्यार्थ्यांची दोन दिवस मुलाखत घेण्यात आली. या निवड समितीमध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, रंजन पंत, महिंद्रा अँड महिंद्राचे बोर्ड सदस्य, महिंद्रा समूहाच्या मुख्य माहिती अधिकारी ऋचा नानावटी, केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भरत दोशी, उल्हास यरगोप आणि ATLAS स्किलटेक विद्यापीठाच्या अध्यक्ष आणि कुलपती डॉ. इंदू शहानी यांचा समावेश होता. निवडलेल्या उमेदवारांमध्ये 29 IIT पदवीधरांचा समावेश होता, तर बाकीचे SRCC, LSR, कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्युट फॉर आर्किटेक्चर अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, NITs, BITS पिलानी आणि नॅशनल लॉ स्कूल यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी होते. या उमेदवारांना परदेशातील सर्वोच्च विद्यापीठ, तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. यामध्ये हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रत्येकी 13, कार्नेगी मेलॉन येथे 8, ऑक्सफर्ड आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्रत्येकी 6, कोलंबिया आणि एमआयटी येथे प्रत्येकी 5, येल, शिकागो विद्यापीठ, जॉन हॉपकिन्स आणि केंब्रिज येथे प्रत्येकी 3, प्रिन्स्टन, जॉर्जिया टेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्रत्येकी 2, अशी विद्यार्थ्यांची विभागणी झाली आहे. शिष्यवृत्तीबद्दल बोलताना, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “केसीएमईटी पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ॲब्रॉड स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील काही हुशार आणि चुणचुणीत तरुणांसोबत गप्पा मारण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा हा एक समृद्ध अनुभव आहे. या संधीची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!” के.सी. महिंद्रा शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी कृपया www.kcmet.org ला भेट द्या.

‘नेता गीता’ २३ ऑगस्टला चित्रपटगृहात

कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल...

फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर), औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स (इंडस्ट्रियल बायो इन्फॉर्मेटिक्स) आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन...

सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने 21 हजार किलो खिचडीचे वाटप

पुणे-प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने 21 हजार किलो साबुदाणा खिचडीचे भाविकांना वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा आमदार...

मनोरुग्णालयाच्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे-खासदार मेधा कुलकर्णी यांनी मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, पुणे येथे भेट देऊन चालत असणारी रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली व तेथील डॉक्टर, कर्मचारी तसेच...

Breaking

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...
spot_imgspot_img