SHARAD LONKAR

54844 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

18 नवदांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुण्यधाम आश्रमात संपन्न।

पुणे- पुण्यधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने यंदाही मनाला स्पर्श करणारा अनुभव दिला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 18 जोडप्यांनी, त्यापैकी 9 दृष्टिबाधित दांपत्यांनी, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी पूर्णतः निःशुल्क आणि विनादहेज आयोजित केलेल्या या सोहळ्यात एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाची सुरुवात केली. हा उपक्रम सलग 10व्या वर्षी साजरा होत असून, आजतागायत 165 हून अधिक विनम्र कुटुंबातील कन्यांचे विवाह येथे थाटामाटात पार पडले आहेत। सुमारे2500 हून अधिक लोकांच्या उपस्थितीत  पुण्यधाम परिसर लग्नाच्या तयारीची धावपळ, शहनाईचे मंगल निनाद, फुलांची आकर्षक सजावट आणि सर्वत्र सणासुदीचे वातावरनात न्हाऊन निघाला स्वर्णलाल साड्यांमध्ये दिमाखात सजलेल्या वधू आणि शेरवानी, फेटे व मोजडीमध्ये रुबाबदार दिसणाऱ्या वरांची बारात उत्साहात नाचत सोहळा स्थळी दाखल झाली। सुंदर सजवलेल्या मंडपात वर-वधू स्थिरावल्यानंतर विद्वान पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये विवाहविधी आरंभ केला। पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीतील अंतरपट, फेरे आणि कन्यादान यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादात संपन्न झाले। पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा कृष्णा कश्यप म्हणाल्या:“पुण्यधाम आश्रम दरवर्षी अशा कन्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो, ज्यांच्या कुटुंबांना भव्य विवाह सोहळ्याचा खर्च उचलणे शक्य नसते। आमचे ध्येय म्हणजे या मुलींचे लग्न त्यांच्या स्वप्नांसारखे, कुटुंब-मित्रांच्या उपस्थितीत, सन्मानाने पार पाडणेतसेच दहेज प्रथेविरुद्ध जनजागृती घडवून समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवणे हा आमचा प्रयत्न आहे।”त्यांचे जीवनमंत्र: “मानव सेवेतूनच ईश्वर सेवा” सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सीए सदानंद शेट्टी, सचिव घनश्याम जावार, विश्वस्त गणेश कामठे, प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ममता सिंधुताई सपकाल, विजय सोनी, विश्वनाथ टोडकर, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती महादेव बाबर, वीरसन जगताप, संगिता ठोसर, जलिंदर कामठे यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। विवाहविधी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षा कृष्णा कश्यप, अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना गृहस्थ जीवनाची सुरुवात सुखकर व्हावी यासाठी घरगुती साहित्य, डिनर सेट, कुकर, चादरी, नव्या साड्या, सलवारकमीज सेट इत्यादी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। “सर्व नवदांपत्यांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा — त्यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि एकोप्याचे चिरंतन आशीर्वाद राहोत” – मा. कश्यप यापूर्वी याच उपक्रमातून विवाहबद्ध झालेले काही दांपत्यही या विशेष समारंभात सहभागी झाले होते हा दृश्य अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला। सर्व पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाची स्वादिष्ट मेजवानीही आयोजित करण्यात आलीया भव्य आणि अत्यंत उदात्त सेवाकार्यातील संपूर्ण श्रेय कृष्णा कश्यप यांनाच जाते त्यांच्या सूक्ष्म नियोजनाशिवाय, अथक परिश्रमांशिवाय आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमातील एकही उपक्रम शक्य नाही।

बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले-इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत

: समर्थ भारत व्याख्यानमाला पुणे - जगाच्या इतिहासात अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांनी अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक युद्धे केली आणि एकही युद्ध ते हरले नाहीत....

हलाल सर्टिफिकेशन नियमावलीत बदल करावा- खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची ‘झिरो अवर’मध्ये मागणी

पुणे:  ‘हलाल’ ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे 'हलाल' सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक व प्रशासकीय अनियमितता दूर...

कोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर पासून

         कोरोना रेमिडीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“Equity Shares”) 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित ·         बोली/ऑफर सोमवार 08 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे. ·         बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल ·         कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत ·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D85CD184-902B-431E-8620-18ABC2F68BE8.pdf मुंबई, 03 डिसेंबर 2025: कोरोना रेमिडीज लिमिटेड (CRL) ने इक्विटी शेअर्ससाठी सोमवार 08 डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त  इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्याची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी आहे. एकूण ऑफर साइजमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी असून यात खालीलप्रमाणे समावेश आहे: डॉ. कीर्तिकुमार लक्ष्मीदास मेहता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त  इक्विटी शेअर्सची 1,298.41 दशलक्ष रु. इतकी रक्कम; मिनाक्षी कीर्तिकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक ) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त  इक्विटी शेअर्सची 766.07 दशलक्ष रु. इतकी रक्कम; दिपाबेन निरवकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यंतचे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले जास्तीत जास्त  पर्यंत इक्विटी शेअर्स; ब्रिंदा  अंकुर मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त  पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेपिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 4,046.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले  पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अँकर पार्टनर्स (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 151.25 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले  पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेज इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 84.24 दशलक्ष रु पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले  पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा यात समावेश आहे. कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत दिली जात आहे. कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) द्वारे हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि BSE लिमिटेड (BSE आणि NSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. कोरोना रेमेडीज ही भारत-केंद्रित ब्रँडेड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कंपनी असून महिलांच्या आरोग्य, कार्डिओ-डायबेटो, वेदना व्यवस्थापन, यूरोलॉजी आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादनांची निर्मिती, विकास, आणि विपणन करण्याचे कार्य करते. 30 जून 2025 पर्यंत कंपनीकडे 71 ब्रँड्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ असून तो विविध उपचारात्मक क्षेत्रांना पूरक आहे. CRISIL इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, कोरोना रेमेडीज ही MAT जून 2024 ते MAT जून 2025 या कालावधीत भारतीय औषधनिर्माण बाजारपेठे (“IPM”) मधील आघाडीच्या 30 कंपन्यांमध्ये देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. MAT म्हणजे चालू वर्षातील एकूण वार्षिक संख्या. MAT जून 2022 ते MAT जून 2025 या कालावधीत देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने IPM मधील अग्रणी 30 कंपन्यांमध्ये कोरोना रेमेडीज ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती. • महिलांचे आरोग्य : किशोरावस्था ते वंध्यत्व, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ तसेच रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या श्रेणींमध्ये महिलांच्या संपूर्ण आरोग्य जीवनचक्राला कव्हर करणारे ब्रँड्स; • कार्डिओ-डायबेटो: मधुमेह उपचाराच्या विविध टप्प्यांना कव्हर करणारे ब्रँड्स. यामध्ये इन्सुलिन प्रतिकारशक्ती, प्री-डायबेटीसपासून डायबेटीस आणि डायबेटीसशी संबंधित गुंतागुंतींपर्यंत, तसेच उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया आणि इस्केमिक हार्ट डिसीज यांसारख्या हृदयविकारांपर्यंत • वेदना व्यवस्थापन: वेदना व्यवस्थापनासाठी कंपनी चार प्रकारचे डोस फॉर्म्स देते – गोळ्या, कॅप्सूल, स्प्रे आणि इंजेक्शन्स. त्यांचा उपयोग मस्क्युलोस्केलेटल स्पॅझम्स आणि डायबेटिक न्युरोपथी पेन यांसह इतर संबंधित उपचारांसाठी केला जातो; • यूरोलॉजी: बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेशिया,  ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर, युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आणि स्टोन मॅनेजमेंट यांसारख्या अनेक यूरोलॉजिकल विकारांसाठी ब्रँड ऑफरिंग्ज. ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. SEBI ICDR नियमांनुसार त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या (“Anchor Investor Allocation Price”) बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी Net QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागांत  वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक इक्विटी शेअर्सची उर्वरित Net...

पुण्यातील कोपा मॉलमध्ये ‘इंडियन ओशियन (Indian Ocean)’ चा दमदार लाईव्ह शो; त्यानंतर विपुल गोयलची धमाल कॉमेडी

पुणे : पुणेकरांच्या मनोरंजनाला नवी झिंग देण्यासाठी कोपा मॉलमध्ये यंदाच्या आठवड्याअखेर दोन खास कार्यक्रमांची मेजवानी सजली आहे; ५ आणि ६ डिसेंबर रोजी सलग दोन संध्याकाळी संगीत व विनोदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. ५ डिसेंबर रोजी भारतीय फ्युजन रॉक संगीताला नवा आयाम देणाऱ्या प्रतिष्ठित ‘Indian Ocean’ बँडचा बहारील ओपन-एअर लाईव्ह परफॉर्मन्स टेरेसवर होणार आहे. पुणेकरांना भावपूर्ण सुरावटी आणि बँडची खास ध्वनीशैली यांचे मनमोहक मिश्रण एका वेगळ्या वातावरणात ऐकण्याची संधी मिळणार आहे. यानंतर, दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी कॉमेडी फेस्ट अंतर्गत लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन - विपुल गोयल, प्रेक्षकांसाठी आपली खास निरीक्षणाधारित विनोदी शैली आणि टोकदार हजरजबाबीपणा घेऊन येणार आहेत. आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी, सहजसुंदर कथा आणि विनोद यांचे अनोखे सादरीकरण पुणेकरांना भरभरून हसवणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. कोपा मॉलचे हे सलग दोन संध्याकाळीचे कार्यक्रमं पुणेकरांना संगीत आणि हास्याचा दुहेरी आनंद देणारे ठरतील. शहराच्या बदलत्या सांस्कृतिक धाटणीला अनुसरून, समुदायाला अधिक समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव देणे, हे मॉलचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरच्या उत्सवी दिवसांत या मनोरंजनमय कार्यक्रमांमुळे पुण्याचे सांस्कृतिक कॅलेंडर अधिक रंगतदार होणार आहे! कार्यक्रम: 1.       Indian Ocean Live – ५ डिसेंबर २०२५ (सायं. ७ वाजता!) 2.       Comedy Fest with Vipul Goyal – ६ डिसेंबर २०२५ (सायं. ६.४५ वाजता!)

Breaking

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन पुणे- शेती, पायाभूत सुविधा,...
spot_imgspot_img