मुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने सुशीलकुमार यांनी चोराला रंगेहाथ पकडलं. गुरुवारी सकाळी मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे.चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील घाटणे गावचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार शिंदेही मूळ सोलापूरचे आहेत. हा निव्वळ योगायोग आहे, की चोराने कुठल्या कारणास्तव पाठलाग करुन त्यांचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; सुशीलकुमार शिंदेंनी चोराला रंगेहाथ पकडलं
Date:

