Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दहशतवादाविरुद्ध पुणेकरांची वज्रमूठ-सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा दहशतवाद विरोधात मोर्चा

Date:

12507591_991938600873199_5027606606862229664_n 12524203_991938887539837_7697760328848168830_n 12552942_991938777539848_7743816823320595478_n index1 1 2

पुणे-ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अशी धमकी आल्याने दहशतवादाविरुद्ध एकजुट दाखवण्यासाठीआज पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दहशतवादाचा निषेध करणारा मोर्चा काढला .

ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अश्या आशयाचा ई-मेल आयसीस या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना आला आणि पुण्यातील तरुणाई अस्वस्थ झाली. देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढणारे बर्गे साहेबांसारखे धडाकेबाज अधिकारी  व त्यांच्या कुटुंबियांना जर दहशतवादी धमकावणार असतील तर हे अधिकारी किवा पोलिस कर्मचारी एकटे नाहीत तर त्यांच्या पाठीशी सर्व नागरिक ठामपणे उभे आहेत हे दाखवून देणे गरजेचे आहे अश्या आशयाचा मेसेज संदीप खर्डेकर यांनी whatsapp वरील पुणे विद्यार्थी चळवळ या ग्रुप वर टाकला आणि त्यावर मनसे चे प्रशांत कनोजिया यांनी त्वरित एक मोठी रेली काढावी असे सुचवून त्यादृष्टीने निरोप देण्यास व नियोजन करण्यास सुरुवात केली.अल्पावधीतच पुण्यातील विविध राजकीय पक्ष,संस्था,संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या ग्रुप वर प्रतिक्रिया यायला लागल्या व कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे भेटायचे ठरले.त्यानुसार मनसे चे प्रशांत कनोजिया,नगरसेवक राजू पवार,रवि बनसोडे,अमोल शिंदे,भाजप चे सरचिटणीस संदीप खर्डेकर,दिलीप उंबरकर,भाजयुमो चे अध्यक्ष गणेश घोष,अल्पसंख्यांक आघाडी चे सरचिटणीस सद्दाम शेख,समर्पण युथ फोरम चे पंकज काळे,उमेश भेलके,ऋषिकेश कुंबरे ,काँग्रेस चे विशाल भेलके,शिवसेनेचे गजानन थरकुडे,राजेश पळसकर, पोलिस मित्र संघटनेचे जयराज लांडगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे इक्बाल शेख,महापेरेंट्स पालक संघटनेचे चे दिलीपसिंग विश्वकर्मा,बाबा चौकसे सारसबाग मित्र मंडळ,महाराष्ट्र नागरिक कृती समिती सुरेश जैन, पतित पावन संघटनेचे सीताराम खाडे,मनोज नायर,स्वप्नील नाईक,दिनेश भिलारे,अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे विश्वजीत देशपांडे,आनंद दवे,सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील,सुदर्शन मित्र मंडळ चे श्याम मारणे ,नेक्स्ट जनरेशन चे बाबा शेख, यासह विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी सावरकर स्मारक येथे बैठक घेऊन चर्चा केली.यानंतर सर्वानुमते रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी दहशतवाद निषेध रेली चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार आज सकाळी बालगंधर्व चौकात मोठया प्रमाणावर नागरिक येण्यास सुरुवात झाली.सर्वपक्षाचे व सर्व धर्माचे नागरिक दहशतवादाविरुद्ध एकजुट दाखवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले.खा.वंदना चव्हाण,आ.माधुरी मिसाळ,आ.मेधा कुलकर्णी,आ.जगदीश मुळीक,कोंग्रेस चे शहराध्यक्ष अभय छाजेड,मोहनदादा जोशी,आर.पी.आय चे शहराध्यक्ष महेंद्र कांवळे, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण,नगरसेवक दीपक मानकर,बाळासाहेब बोडके,मानसी देशपांडे,मुक्ता टिळक,मनीषा चोरबेले,दत्ता खाडे,मनसे चे किशोर शिंदे,रविंद्र धंगेकर,सुशीला नेटके,पुष्पाताई कनोजिया,बाळासाहेब शेडगे,राजु पवार,शिक्षण मंडळ सदस्य मंजुश्री खर्डेकर,रवी चौधरी,यासह अनेक मान्यवर नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर क्रुष्णा यादव यानी तयार केलेल्या समईतील दीप प्रज्वलित करुन या मूक मोर्च्यास प्रारंभ करण्यात आला.(सदर समईवर जगाचा नकाशा व त्यावर सर्व धर्मचिनह अंकित करण्यात आले आहेत.)
यावेळी संयोजक  संदीप खर्डेकर,प्रशांत कनोजिया यांच्यासह बाबाशेठ मिसाळ,बाबा शेख,इकबाल शेख,कादर शेख,मेहबुब शेख, ई उपस्थित होते.
या मूक मोर्च्याचा समारोप सावरकर स्मारक येथे करण्यात आला.यावेळी आ.मेधा कुलकर्णी,आ.माधुरी मिसाळ,मा.विनायक निम्हण,आ.जगदीश मुळिक,पुष्पाताई कनोजिया,हिंदकेसरी अमोल बुचडे,यानी आपले मनोगत व्यक्त करताना दहशतवाद्यांचा निषेध केला व दहशतवादाविरुद्ध च्या लढयात सर्व पुणेकर एकदिलाने ठामपणे उभे आहेत अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक संदीप खर्डेकर यानी केले तर आभार व समारोप प्रशांत कनोजिया यानी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन पुणे- शेती, पायाभूत सुविधा,...

शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या २४९ वाहनांवर कारवाई

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे,...