आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा महाराष्ट्रातील 9.64 लाख नियोक्त्यांना लाभ

Date:

मुंबई, 26 जुलै 2022

महाराष्ट्र राज्यातील 9.64 लाख नियोक्त्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (एबीआरवाय) लाभ झाला आहे. तर 10 जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार या योजनेचे देशभरात 59.53 लाख लाभार्थी असल्याचे आढळून आले,  असे प्रतिपादन श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी लोकसभेत केले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात तेली यांनी सांगितले की, एबीआरवाय योजनेचे 4711 लाभार्थी अमरावती मधील आहेत.

2022-23 या आर्थिक वर्षात   योजनेंतर्गत 6400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही तेली यांनी सांगितले. केन्द्र सरकार, एबीआरवाय अंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीसाठी  कर्मचार्‍यांचा वाटा (वेतनाच्या 12%) आणि नियोक्त्याचा वाटा’ (वेतनाच्या 12%) जमा करत आहे.  किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने समवेत नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांतील रोजगार क्षमतेनुसार  फक्त कर्मचार्‍यांचा हिस्सा भरत आहे. एआरबीवाय अंतर्गत ईपीएफओ सोबत नोंदणीकृत प्रत्येक आस्थापना आणि त्यांच्या नव्या कर्मचाऱ्यांना (प्रति महिना रु. 15,000/- पेक्षा कमी वेतन) लाभ दिले जातात. आस्थापनांनी 1.10.2020 रोजी किंवा नंतर आणि 30 जून 2021 पर्यंत नवीन कर्मचारी घेतल्यास अथवा  01.03.2020 ते 30.09.2020 दरम्यान नोकर्‍या गमावल्या आहेत अशांना हा लाभ दिला जातो.

विशेष म्हणजे, योजनेची व्याप्ती, म्हणजेच योजनेअंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या नोंदणीची अंतिम तारीख 30 जून 2021 वरुन 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना श्रम  आणि रोजगार मंत्रालयाद्वारे लागू केलेल्या योजनेअंतर्गत नोंदणीच्या तारखेपासून

2 वर्षांसाठी लाभ मिळत राहतील.   एबीआरवायची घोषणा आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेजचा एक भाग म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करण्यात आली. कोविड नंतर उभारी घेण्याच्या टप्प्यात रोजगार निर्मिती वाढवणे, सामाजिक सुरक्षा फायद्यांसह नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि कोविड-19 महामारीदरम्यानची  रोजगाराची हानी भरुन काढणे हा यामागचा उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...