विधानसभा अध्यक्ष:भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवार

Date:

राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. यापूर्वी, राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव विधानसभा अध्यपदासाठी आघाडीवर होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज संध्याकाळी बैठकदेखील झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय अडथळे येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यासाठी राज्यपालांना विनंती करून देखील ही परवानगी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूत्र वेगाने हलू लागली असून तातडीने बोलावण्यात आलेल्या अधिवेशनातच ही निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशातच दोन्हींकडून म्हणजेच शिंदे गटातून आणि भाजपकडूनदेखील विधानसभा अध्यपदासाठी चाचपणी सुरू होती. सुरुवातीला राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. राधाकृष्ण पाटील हे ज्येष्ठ नेते असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर विधिमंडळ कामकाजाचादेखील त्यांना चांगला अनुभव असल्याने विखे यांचे नाव आघाडीवर होते.

विधानसभा अध्यपदासाठी तीन ते चार नाव चर्चेत होती. तथापि, बैठकीनंतर राहुल नार्वेकर यांचे नाव समोर आले. भाजपच्या सर्व आमदारांना दुपारी दोन वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते. भाजप कार्यालयात आज जल्लोषाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. भारतीय जनता पक्षाते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील इतर नेत्यांसह उपस्थित होते. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीमुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. मुंबईतील दादर नायगाव मतदार संघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...