Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सभासदांना ,परिवाराला सुमारे १३० लाख एवढी रक्कम आजारपणासाठी देऊन अन्नपूर्णा परिवाराने पुरवली अद्वितीय सेवा

Date:

  • आत्तापर्यंत १००% टक्के कर्ज वसुली
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिला उद्योजकांसाठी विशेष सेवा व योजना

पुणे-‘स्वयंरोजगार करणाऱ्या महिला सभासदांच्या सक्षमीकरणासाठी ‘ अन्नपूर्णा परिवार’ गेली पंचवीस वर्षे कार्यरत असून, आतापर्यंत या परिवारामध्ये एक लाखांपेक्षा अधिक महिला सदस्य सहभागी झाल्या आहेत. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये संस्थेने एकूण १५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून, अनुत्पादित कर्जाची टक्केवारी अवघी एक टक्का इतकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे व्यापक ध्येय गाठण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे, अशी माहिती ‘अन्नपूर्णा परिवारा’च्या अध्यक्षा डॉ. मेधा सामंत पुरव यांनी दिली.

‘अन्नपूर्णा परिवार केवळ गरिबांना विना तारण कर्ज सुविधा देतेच, पण त्यांना एका सर्वंकष पॅकेजमध्ये कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार विमा, म्हातारपणाची सोय म्हणून पेन्शन योजना; तसेच विना आर्थिक सेवांमध्ये पाळणाघरे, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण अशा सुविधाही पुरविते. अन्नपूर्णा परिवार आपल्या सभासदांकडून ऐच्छिक बचत स्वरूपात बचत गोळा करते. ज्यामध्ये २०१७-१८ या वर्षात वाढ होऊन ही रक्कम ३३ कोटीवरून  ४० कोटीपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर संस्थेने २०१७-१८ मध्ये आपल्या सभासदांना तसेच, त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३० लाख रुपयांची  रक्कम आजारपणाच्या दाव्यांपोटी दिली आहे. ही एक अनोखी सुविधा ‘अन्नपूर्णा’ पुरविते, अन्य कोणतीही ‘मायक्रो फायनान्स’ संस्था अशी सुविधा देत नाही’, असेही त्यांनी नमूद केले

विशेषतः नोटाबंदीच्या निर्णयामुळे “मायक्रो फायनान्स” व्यवसायाला फार जबरदस्त धक्का बसला कारण मायक्रो फायनान्स आपल्या देशातील गरीब लोकांना कर्ज पुरविते. बँकिंग व्यवसायातील अनुत्पादक मालमत्ते मध्ये (NPA) देखील गेल्या ५ वर्षात वाढ झालेली दिसते परंतु “मायक्रो फायनान्स” व्यवसायातील अनुत्पादक मालमत्ता जी सतत गेली ५ वर्षे २% पेक्षा कमी होती तिच्यात वाढ होऊन राष्ट्रीय स्तरावर  ९% व राज्य स्तरावर २०% इतकी झाली.

डॉ. मेधा सामंत म्हणाल्या ,अन्नपूर्णा परिवार न केवळ गरिबांना विना तारण कर्ज सुविधा देते परंतु त्यांना एक सर्वंकष आर्थिक पॅकेज ज्यामध्ये कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार वीमा, म्हातारपणाचीसोय म्हणून पेंशन योजना तसेच विना आर्थिक सेवां मध्ये पाळणाघरे, क्लायंट शिक्षण , आर्थिक साक्षरता प्रशिक्षण इ. सेवा पुरविते.

अन्नपूर्णा परिवार ने गेल्या आर्थिक वर्षात २०१७-१८ मध्ये एकूण रु.१५० कोटी चे कर्ज आपल्या सभासदांना वाटप केले जे अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी चे भागधारक सुद्धा आहेत. अनुत्पादक मालमत्ता देखील १% होती जी इतर मायक्रो फायनान्स संस्थांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

अन्नपूर्णा परिवार आपल्या सभासदांकडून स्वैच्छिक बचत स्वरूपात बचत गोळा करते. ज्यामध्ये वाढ होऊन ही रक्कम २०१७-१८ मध्ये रु.३३ कोटी वरून रु.४० कोटी इतकी जमा झाली.

अन्नपूर्णा परिवार ने २०१७-१८ मध्ये आपल्या सभासदांना तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांना रु. १३० लाख एवढी रक्कम आजारपणाच्या दाव्यांपोटी दिली. ही एक अद्वितीय सेवा अन्नपूर्णा पुरविते जी अन्य कोणतीही मायक्रो फायनान्स संस्था देत नाही. भारतातील मायक्रो इन्शुरन्स संस्था या अजून पर्यंत गरीब व गरजू लोकांच्या स्वास्थ्य संबंधी गरजांपर्यंत पोहचल्या नाहीत.

अन्नपूर्णा परिवार ने २०१७-१८ मध्ये आपल्या सभासदांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना (जीवन वीमा +परिवार वीमा ) असे मिळून रु. ३८ लाख एवढी रक्कम मृत्यूचे दाव्यांपोटी दिली.

या सर्व आर्थिक सेवा पुरवित अन्नपूर्णा संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.

२०१८-१९ वर्षा करिता अन्नपूर्णा परिवाराचा आपल्या सभासदांसाठी कर्ज, बचत, स्वास्थ्य, जीवन व परिवार वीमा सम्मिलित एक चांगले पॅकेज देण्याचा मानस आहे. कमी व्याज दरात जास्त कर्ज, कर्जाची सीमा ही रु.३०,०००/- ते रु. २० लाख विना तारण देणे, स्वास्थ्य संबंधी वीमा हा मागील वर्षी पेक्षा या वर्षी रु.२०,०००/- ते रु.३५,०००/- प्रती व्यक्ती असा असणार आहे.

आम्ही अथक परिश्रम करून आमच्या सभसदांचे बँक खाते उघडुन दिले ज्यामुळे एप्रिल २०१८ पासून

आम्ही रोख रहित व्यवहार प्रणालीचा वापर करणार आहोत. अन्नपूर्णा परिवाराने आपल्या समूहाला अधिक चांगले आणि सशक्त जीवन देण्यासाठी आपल्या क्रेडिट सोसायटीमध्ये नवीन योजना केल्या आहेत. त्यांनी कर्जाची रक्कम वाढवली तसेच एफडी वर जास्त दर दिला आहे.

अशा प्रकारे आम्ही आमच्या गरीब स्वयंरोजगार करणाऱ्या महिला सभासदांच्या सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्याचा तसेच लाभ रहित व्यापक विकासाचे आमचे मॉडेल कायम ठेवण्याचा सदैव प्रयत्न करू. असे डॉ. मेधा सामंत यांनी म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...