पुणे:महाटेक – २०१८ हे औद्योगिक प्रदर्शनाचे उदघाटन कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचन नगर, शिवाजी नगर, पुणे येथे कोनक्रेन चे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास बक्शी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाटेकचे संस्थापक काकासाहेब मराठे, पालक मंत्री श्री गिरीश बापट (पुणे) आणि महापौर सौ.मुक्ता टिळक हे प्रतिष्ठित अतीथी म्हणून उपस्थित राहिले होते .
या वेळी महाटेक चे संस्थापक श्री. काकासाहेब मराठे, श्री. विनय मराठे, संचालक(महाराष्ट्र इंडस्ट्री डिरेक्टरी), श्री राजेंद्र माली, संचालक (फायर प्लाय), कु. गौरी मराठे, डिजिटल मार्केटिंग हेड (मराठे इन्फोटेक), श्री पवन सिंह राठोड, सह-संस्थापक, (स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लेंडरशिप), सौ. वृषाली हुरडे, संचालिका (शारदा केबल ट्रेज) आदी. मान्यवर उपस्थित होते.
महाटेकने यावर्षी १४व्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्पादक आणि वितरकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ व आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा हा महाटेक २०१८चा मूळ उद्देश आहे. महाटेक मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत.
यावेळी बोलताना कोनक्रेन चे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुहास बक्शी म्हणाले,
” व्यवसाय मर्यादित ठेवू नका तो वाढवायचा प्रयत्न करा आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करण्या पेक्षा एकमेकांना सहकार्य करा तरच आपले उद्योग हे देश विदेशात पसरतील. ”
यावेळी महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचे संचालक विनय मराठे म्हणाले की,” गेल्या काही वर्षात महाटेकने स्वतःचा पाय भक्कमपणे रोवला असल्याने आज मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्री मधून मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. पुणे आता जवळजवळ एक दशकांपासून एक विकसित जिल्ह्या असून शहराचा परिसरात स्थायिक झालेले अनेक नवीन उद्योग आहेत. यात अभियांत्रिक उद्योग हि मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. याच स्थानिक उद्योजकांसाठी नवीन तंत्रज्ञान तयार करणे आवश्यक आहे. प्रदर्शनामध्ये नामांकित कंपन्यांनी आपले स्टॉल बुक केले आहेत. शहरातील उद्योजक आणि नवीन उद्योजकांना माहिती मिळवून देण्याची ही उत्तम संधी आहे. तसेच या मध्ये छोट्या उद्योजकांसाठी ४ विविध परिषदांचे आयोजन करण्यात आले आहेत”
महाटेक २०१८ या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी झालेल्या असून आधुनिक उत्पादने, उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत असून मोठ्या उद्योज कांपासुन ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश आहे. तसेच इतर उद्योजकांशी व्यावसायिक चर्चा होतात. यामध्ये देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांचे अद्यावत तंत्रज्ञान, उपकरणे पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. प्रक्रिया, उपकरणे, इलेकट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशण उपकरणे या चार प्रकारामध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
या मेगा प्रदर्शनामध्ये व्यक्तिगत पातळीवर व्यवसाय मार्गदर्शन आणि नेटवर्किंग संधी असल्याने बाजारपेठेतील बदलता ट्रेंड ओळखण्यास नवउद्योजकांना यामधून निश्चित सहाय्य मिळेल.
या प्रदर्शनात भाग घेतलेल्या काही नामांकित कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
Indian Tools-Birla Group Company, FS Compressors India, Suresh Indu Lasers Pvt. Ltd., Sharang Corporation, MGSTechnologies, SH Electronics co, Indo construction fastening systems (ICFS), SFS Equipments private limited, BDS Machines Private limited, Excellent handling systems Pvt Ltd., Energy Mission Machineries India Pvt ltd, Hiver Aircon private limited, Trilok lasers Pvt ltd, Innovative Solutions, Berlin Machine Corporation, Purvaj Engineers, Rajesh machines (India) LLP, Mikro Innotech India Pvt ltd, SFS Equipments private limited, Fuel instruments
- व्हेंडर डेव्हेलपमेंट मीट:
आमच्या महाटेकच्या प्रदर्शकांसाठी, शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी १०.३० ते ५.३० ला आगामी येणाऱ्या महाटेक २०१८ मध्ये विक्रेता विकास परिषद आयोजित करण्याचा मनसुबा आहे. प्रदर्शक एसेमीना विक्रेता विकास परिषदेचा फायदा होईल. ओईम खरेदीदार व एसेमी विक्रेत्यांमध्ये माहितीची सुलभ देवाण -घेवाण, विक्रेता नोंदणी प्रक्रियेची माहिती, संबंधित कायदे व नियम, ओईम चे नियम हा ह्या परिषदेचा उद्देश आहे.
- GST कि बात:
हि परिषद महाटेक कडून दि.१० फेब्रुवारी २०१८ रोजी १०.३० ते १.३० ला आयोजित करण्यात आलेली आहे.
या मध्ये GST आणि SMEs या विषयावरील मार्गदर्शन श्री. मानस जोशी MCCIA चे समिती सदस्य यांच्या कडून मिळणार आहे.हा जीएसटीवर विविध कंपन्यांना ऑनलाइन पाठिंबा देण्यासाठी एक विशेष मंच आहे. या परिषदे मध्ये अशा गोष्टीन वर चर्चा होणार आहे कि जे उद्योगान मध्ये जीएसटीचे पालन करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागते, बजेट मधील जीएसटीतील महत्वाचे बदल व परिणाम, ई-वे बिल संबंधित तरतुदी समजून घेणे, या परिषदेत वित्त, कर, लॉजिस्टिक्स,अकाउंटिंग, आयटी, शैक्षणिक, वित्त कंट्रोलर्स, सीएफओ, पार्टनर्स, मॅनेजर्सचे सर्व व्यावसायिक सहभागी होणार आहे .
- SME’s साठी डिजिटल मार्केटिंग:
त्याच दिवशी दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत डिजिटल मार्केटिंग या विषयावर परिषद होणार आहे. SMEs वर विविध प्रकारच्या डिजिटल मीडियाद्वारे ब्रँडला प्रोत्साहन आणि लोकप्रिय करण्यासाठी हा मुख्य उद्देश आहे. डिजिटल मीडिया चॅनेलचे लाभ जसे की वेबसाइट, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO), सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मिडिया मार्केटिंग, रीस्ट्रॉल्टिंग आणि रीमार्केटिंग.
- एन्त्रेप्रेनेऊरशिप डेव्हलोपमेंट परिषद :
हि परिषद दि.११ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी १०.३० ते ५.०० या वेळेत ठेवण्यात आलेली आहे. या परिषदे मध्ये स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लीडरशिप कडून व्यवसाय कसा यशस्वी बनवायचा व येणाऱ्या संकटाना कसे सानोरे जायचा यावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.याचा उपयोग उद्योजकांना व नवीन व्यावसायिकांना होणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.