पुणे-साईश्री हॉस्पिटल, औंध तर्फे आजी व माजी पोलिस अधिकारी व लष्करी अधिकारी यांसाठी मोफत ऑर्थोपेडिक तपासणी हा
उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये ऑर्थोपेडिकच्या तपासण्या अधिकारी त्याचबरोबर त्यांच्या पती/ पत्नीच्या देखील मोफत केल्या
जाणार आहेत .
ड्यूटीवर असताना अधिकारी अनेक वेळा जखमी होतात. यावेळी त्यांच्या सांध्यांना व स्नायुंना दुखापत होत असते. यावर साईश्री
हॉस्पिटलचे संचालक व अध्यक्ष डॉ. नीरज आडकर म्हणाले कि, “आपल्या देशाचे व देशातील नागरिकांचे संरक्षण करणारे पोलिस
व लष्करी अधिकारी, त्यांची जबाबदारी बजावत असताना, होणाऱ्या दुखापती कडे दुर्लक्ष करतात. यामुळे ऑर्थोपेडिक समस्या उद्भवू
शकतात.”
हा उपक्रम साईश्री हॉस्पिटल मध्ये कायम स्वरूपी चालू राहणार आहे. पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेचे आभार
मानण्यासाठी हॉस्पिटल ने हा उपक्रम हाती घेतला आहे. साईश्री हॉस्पिटलचा हेतू जागरूकता वाढवणे आणि आर्थोपेडिक
समस्यांविषयी पुरेशी वैद्यकीय मदत प्रदान करणे हे आहे. या तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे व त्यांच्या पती/ पत्नी चे ओळखपत्र अनिवार्य
आहे.