पुण्यात तिसऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे’ आयोजन

Date:

  • तीन दिवसीय परिषदेत जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टरव संशोधक उपस्थित राहणार.
  • भारतातील  १५५० डॉक्टरांची  परिषदेला उपस्थित राहणार आहे.
  • भारतातून ५० मधुमेह विशेषज्ञ व संशोधकआपले संशोधनपर निबंध सादर करणार.

पुणे-मधुमेहावर उपचार करणारे एक अग्रगण्य हॉस्पिटल असलेल्या चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी तर्फे आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन ८ मार्च ते १०मार्च २०१९ दरम्यान हॉटेल जे डब्लू मॅरीयेट, पुणे येथे करण्यात आले आहे. ही चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीने आयोजित केलेली तिसरी आंतरराष्ट्रीयमधुमेह परिषद आहे. याचे उद्घाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

भारतात मधुमेह होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ७.४ कोटी भारतीय मधुमेह ग्रस्त आहेत. यामधील अर्ध्या लोकांना माहित देखील नसत की त्यांना मधुमेह आहे. मधुमेहावर नियंत्रण न आणल्यास  किडनी, नस, डोळे आणि हृदय याची हानी होते.  मधुमेह व त्यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचार या विषयी चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक किर्तीचे तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत.  याशिवाय या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत संस्था जसे कि कॅरोलिन्सका इन्स्टिटयूट, लुंड विश्वविद्यालय, ओरेब्रो (स्वीडन), मेयो क्लिनिक, व्हर्जिनिया विद्यापीठ आणि मियामी विद्यापीठ (यु.एस.ए), कार्डिफ विद्यापीठ व मॅन्चेस्टर विद्यापीठ(इंग्लंड) सहभाग घेणार आहेत. भारतातून ५० डाएबेटीस विशेषज्ञ व संशोधक आपले संशोधनपर निबंध सादर करणार असून यापैकी एकाला चेलाराम फाउंडेशन डाएबेटीस रिसर्च अवॉर्ड व एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतातील  १५५० डॉक्टर्स  परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे अध्यक्ष श्री. लाल एल चेलाराम म्हणाले की “चेलाराम मधुमेह संस्था नेहमीच मधुमेह आणि त्याची गुंतागुंत टाळण्याकरिता लढण्यात आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे ह्या क्षेत्रातील नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा हा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे मधुमेहाचे व त्याचे दुष्परिणाम या वरील उपचारांवर मोठा प्रभाव पडेल.”

यावेळी चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन म्हणाले की “ या परिषदेनिम्मित जगभरातील विख्यात मधुमेह तज्ञ उपस्थित राहणार आहेत. पाश्चात्य देशांमध्ये मधुमेहाशी तुलना करता भारतात मधुमेह एक वेगळे आव्हान आहे. मला आशा आहे की या परिषदेच्या मध्यमातून भारतातील मधुमेहामुळे ग्रस्त लाखो लोकांना नवीन उपाय मिळेल.”

तसेच चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटीचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत म्हणाले की “चेलाराम हॉस्पिटल डायबेटीस केअर अँड मल्टीस्पेशालिटी अत्याधुनिक सोई सुविधां बरोबर पोडियाट्री डिपार्टमेन्ट, रिअल-टाइम रेगुलर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इंसुलिन पंप, बेरिएट्रिक सर्जरी, एंडोक्रायोलॉजी, हेमोडायलिसिस केंद्र यासारख्या उपकरणे व सुविधा उपलब्द्ध आहेत. याच बरोबर चेलाराम हे मल्टिस्पेशालिटी केअर असून या मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफथालमीक केअर व प्रगत रेडिओलॉजिकल इमेजिंग इ. चा समावेश देखील आहे.”

या परिषदेत मधुमेहामुळे होणारी ‘पायाची न्यूरोपॅथी’ ही कार्यशाळा हे एक वैशिष्ठ्यपूर्ण सत्र आहे. ह्या कार्यशाळेत मधुमेही व्यक्तीचे पाय कसे तपासावेत तसेच पायांच्या जखमा व व्रण कशाप्रमाणे उपचार करावे ह्याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले जाणार आहे. कमी उष्माकांचा आहार व व्यायाम ह्यांचा वजनामध्ये होणारी घट तसेच मधुमेहापासून मुक्ती ह्यांचा परस्पर संबंध ह्याविषयी चर्चासत्र होणार आहे. तसेच ह्या परिषदेत मधुमेहावरील नवीन उपचार, बेरिएट्रिक सर्जरी, पायातील जंतू संसार्गावरील नवीन उपचार औषधी, थायरोइड ग्रंथीचे विकार, कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM)  इ. विषयी चर्चा होणार आहे.

तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद- २०१९ हे वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तकी आणि प्रात्यक्षिक ज्ञान याला जोडणारा एक दुवा ठरू शकेल. तसेच ही परिषद डॉक्टर व संशोधक यांना मधुमेहाच्या नवीन बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी एक वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...

आरटीई साठीची एक किलोमीटर ची मर्यादा बेकायदेशीरच!आरटीई नियम बदल हे शैक्षणिक हक्काविरोधातील षड्यंत्रच!

पुणे-मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब व वंचित घटकातील मुलांसाठीच्या...

शालेय अभ्यासक्रमात नैतिकता हा विषय समाविष्ट करावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शालेय अभ्यासक्रमात नैतिकता या विषयाचा स्वतंत्रपणे समावेश...