कोल्हापूर, 29 मे 2022 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील पुरस्कृत 16व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या आश्विन नरसिंघानी, प्रद्युम्न तोमर, अवनीश चाफळे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत कोल्हापूरच्या बिगरमानांकीत आश्विन नरसिंघानी याने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवता तामिळनाडूच्या अव्वल मानांकित जी बालासुर्याचा 6-2, 3-6, 7-6(6) असा पराभव करून आजचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या प्रद्युम्न तोमरने गुजरातच्या तिसऱ्या मानांकित अक्षज सुब्रमणियनचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. बाराव्या मानांकित पुद्दुचेरीच्या प्रणव सर्वनकुमार याने राजस्थानच्या सहाव्या मानांकित अमित मूदचा 6-2, 7-6(5) असा तर, महाराष्ट्राच्या अवनीश चाफळेने तेलंगणाच्या सातव्या मानांकित लोकेश राहुलचा 6-4, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या सोळाव्या मानांकित पेहल खराडकर हिने कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित साई जानवी टीचा 6-4, 7-5 असा पराभव करून आगेकुच केली. स्पर्धेची मुख्य ड्रॉची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली असून त्यात मुलींच्या गटात उत्तराखंडच्या नियती कुकरेतीला अव्वल मानांकन देण्यात आले. तर कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव दुसरे, तर कर्नाटकच्या श्रीनिधी बालाजीला तिसरे मानांकन देण्यात आले. मुलांच्या गटात कर्नाटकच्या क्रिश त्यागीला अग्रमानांकन देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुली: अंतिम पात्रता फेरी:
आदिती भट(कर्नाटक)[1] वि.वि.दिया मलिक(तेलंगणा)[9]6-1, 6-1; पेहल खराडकर(मध्यप्रदेश)[16]वि.वि.साई जानवी टी(कर्नाटक)[2]6-4, 7-5; प्रिशा शिंदे(महा)[10] वि.वि.जीडी मेघना(कर्नाटक) 7-5, 6-3;दिया रमेश(तामिळनाडू)[15] वि.वि.रिद्धी शिंदे(महा)6-1, 6-3;आरुषी रावळ(गुजरात)[5]वि.वि.सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)[12] 7-5, 6-4;
सौम्या रोंडे(तेलंगणा)[6] वि.वि.मेहक कपूर(महा)[14]6-2, 6-1;
अमोदीनी नाईक(कर्नाटक)[7]वि.वि.आनंदी भुतडा(महा)[11] 6-0, 6-1;
रिशीथा बासिरेड्डी(तेलंगणा)[8]वि.वि.डेनिका फर्नांडो(महा)[15]6-2, 6-1;
मुले: अंतिम पात्रता फेरी: आश्विन नरसिंघानी(महा)वि.वि.जी बालासुर्या(तामिळनाडू)[1] 6-2, 3-6, 7-6(6);आर्या कळंबेल्ला(कर्नाटक)[2]वि.वि.गंधर्व कोथापल्ली(कर्नाटक)[9] 7-6(10), 6-2;
प्रद्युम्न तोमर(महा)वि.वि.अक्षज सुब्रमणियन(गुजरात)[3] 6-2, 6-1;
अभिराम निलाखे(महा)वि.वि.शिवम पडिया(महा)6-0, 6-1;
अक्षित बालसुब्रमणियन(तामिळनाडू)वि.वि.दियान छेडा(महा)6-2, 6-3;
प्रणव सर्वनकुमार(पुद्दुचेरी)[12]वि.वि.अमित मूद(राजस्थान)[6] 6-2, 7-6(5);
कबीर चोथानी(गुजरात)[8] वि.वि.ओमकार शिंदे(महा)6-3, 7-5;
अवनीश चाफळे(महा)वि.वि.लोकेश राहुल(तेलंगणा)[7] 6-4, 3-6, 6-3.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: मुले: 1. क्रिश त्यागी(कर्नाटक), 2.साहो देबसिस(ओडिशा), 3.वंश नांदल(हरयाणा), 4.तेजस आहुजा(हरयाणा), 5.धुरव सचदेवा(हरयाणा), 6.अर्जुन राठी(हरयाणा), 7.स्वस्तिक शर्मा(दिल्ली), 8.रेथीन प्रणव आरएस(तामिळनाडू);
मुली: 1.नियती कुकरेती(उत्तराखंड), 2.ऐश्वर्या जाधव(महा), 3.श्रीनिधी बालाजी(कर्नाटक), 4.हर्षिनी विश्वनाध(आंध्रप्रदेश), 5.नैनिका बेन्द्रम(महा), 6.मनोज्ञ मदसू(आंध्रप्रदेश), 7.सायली ठक्कर(गुजरात), 8.शगुन कुमारी(उत्तरप्रदेश).

