पुणे- आठ वर्षाच्या असिफाला न्याय मिळालाच पाहिजे या मागणी साठी भाजपच्या नगरसेविकांनी देखील पुढे आले पाहिजे , महिला मुलींवरील अत्याचारा संदर्भात पक्षभेद विसरून महिलांनी एकजूट दाखविली पाहिजे असे मत व्यक्त करीत स्थायी समिती च्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिकेच्या सभागृहात या बाबत भाजप नगरसेविका का मागे राहिल्या ? त्यांच्या महिला अत्याचाराच्या विरोधातील भावना बोथट झाल्या आहेत काय ?असा सवाल केला आहे .
महिला मुलींवरील अत्याचार संदर्भात राजकीय पक्षा च्या भिंती उभ्या करण्या पेक्षा सर्वपक्षीय नगरसेविकांनी एकजूट दाखविली पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपल्या स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत निर्भया योजना मांडली होती. जिथे महिला आणि मुलींची वर्दळ असते अशा ठिकठीकाणी निर्भय पथके तैनात करावीत जेणेकरून टवाळखोरांवर धाक बसून महिलांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही . अशी पथके तैनात करण्यासाटी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घ्यावा असे हि त्या म्हणाल्या … पहा आणि ऐका नेमके अश्विनी कदम यांनी काय म्हटले आहे .
असिफाला न्याय मागण्यासाठी भाजपच्या नगरसेविकांनी देखील पुढे येण्याची गरज – अश्विनी कदम
Date:

