पुणे- पद्मावती परिसरात बौद्ध विहार येथे नगरसेविका सौ.आश्विनीताई नितीन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले होते. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण 414 नागरिकांना मोफत चष्मे दिले. व 38 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुचवली व त्याचा पाठपुरावा करत विनामूल्य शस्त्रक्रिया होईल यासाठी प्रयत्न राहील, असे अश्विनी कदम यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी आपले मत मांडत म्हणाले की “पद फक्त नावाला नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी असते आणि तेच सेवा आश्विनीताई व नितीन भैय्या यांच्या कामातून दिसून येते.” कदम दाम्पत्य हे गरीब , होतकरू, कष्टकरी परिवारासाठी सगळ्या अडचणी कशा दूर होतील यासाठी खंबीरपणे उभे असतात असे असे सांगत लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचे कौतुक करत येणारा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला, यावेळी शिबिरास महेश शिंदे , डॉ. नितीन बोरा , राजाभाऊ गरुड , आशिष वाळके , प्रशांत पवार , सुनील ओव्हाळ , तुषार नांदे, संग्राम वाडकर, सचिन जमदाडे , अर्जुन जानगवळी, प्रवीण खत्री , संजय कानडे ,राजाभाऊ अवघडे, तेजस मिसाळ, संदीप मारणे , प्रकाश कुंभार, अरुण उदमले , संकेत शिंदे ,संग्राम नागडे ,निशांत पवार, सिद्धार्थ गरुड, दिलीप पवार, उमेश म्हस्के, अमन शिंदे, समाधान जोगदंड, प्रदीप शिंदे, अजय धनवे,दीपक कांबळे, गणेश जोगदंड, रोहन कांबळे, आशिष पोळके, कुणाल थोरात, अक्षय सरवदे, अक्षय मस्के, रुपेश गरुड व सतेज युवक विकास मंडळ सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महादेव जाधव, आशिष वाळके, अरुण ढावरे, अजय मिसाळ, सोमनाथ खंडाळे, प्रसाद खंडाळे यांनी परिश्रम केले.

