पुणे- निर्माता, लेखक याबरोबर कवींची कार्यशाळा देखील घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या कारीकीर्दीत करू असे आश्वासन येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी येथे दिले .
निर्माते,दिग्दर्शक,लेखक अशोक बबनराव सूर्यवंशी यांच्या आयुष्यातील प्रेरणात्मक घटनांवर आधारित ऋषिकेश सूर्यवंशी निर्मित व हृदयमानव लिखित ,दिग्दर्शित ‘सूर्य ज्ञान रुपी .. बहुगुणी ‘ या डॉक्युमेंटरी फिल्म चा प्रकाशन सोहळा श्री राजेभोसले यांच्या हस्ते येथे संपन्न झाला. ‘सलाम पुणे’चे अध्यक्ष, वरिष्ठ पत्रकार शरद लोणकर , तसेच गीतकार विष्णुजी थोरे, वरिष्ठ पत्रकार सुरेश शिंदे ,लेखिका शोभा शिरढोणकर,सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, बालकलाकार ऋतिका गायकवाड,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . बिगारी या पुस्तकाचे लेखक मदन देगावकर -दादांडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला . स्वाती कडू, विद्या नलावडे , आणि शुभम वाळूंज यांना युवा साहित्यिक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ‘साद मनाची ..ओंजळ कवितांची .. हा कवितांचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. हृदयमानव अशोक, निखील जगताप , शुभम काकडे, शुभम वाळूंज ,शाहीर प्रमोद जगताप ,रितेश साळवे, प्रवीण शिंदे, प्रदीप कोळपे, अनिकेत हुंबरे , स्वाती कडू ,विद्या नलावडे ,आदी कवितांनी आपल्या कवितांनी रंग भरले .
पहा या कार्यक्रमाची एक (व्हिडीओ)झलक ….
कवींची कार्यशाळा देखील घेण्याचा प्रयत्न चित्रपट महामंडळ करेल – मेघराज राजेभोसले
Date: