पुणे :
शॉर्टटर्म स्कूलिंग अध्ययन प्रकल्पासाठी पुण्यात आलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी बालेवाडी येथे फुटबॉल खेळाचा आनंद लुटला. ही स्पर्धा फुटबॉल क्लब , पुणे आणि मुंबई सिटी यांच्यामध्ये झाली.
भारतीय लष्कर आणि असीम फाऊंडेशनच्या वतीने 20 विद्यार्थी 24 सप्टेंबर रोजी सोपोर, बांदीपूर येथून पुण्यात आले आहेत. 10ऑक्टोबरपर्यंत ते पुण्यात आहेत. मिलेनियम स्कूल (कोथरूड) येथे हे विद्यार्थी काश्मीरमधील त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. शिवाय पुण्यातील पर्यटन, ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत, अशी माहिती ‘असीम फाऊंडेशन’चे अध्यक्ष सारंग गोसावी यांनी दिली.

