Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तब्बल ७५ माध्यमांतूून साकारली लोकमान्यांची व्यक्तिचित्रे

Date:

पुणे, दि. १० : तब्बल ७५ प्रकारांच्या विविध माध्यमांचा उपयोग करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ७५ व्यक्तिचित्रे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचे पर्यवेक्षक आणि चित्रकला शिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी साकारली आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या आणि रमणबागेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा अभिनव उपक्रम करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू आणि डीईएसचे संस्थापक असणार्‍या लोकमान्यांना त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ही आगळी-वेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली. या चित्रांची निर्मिती करण्यासाठी गेल्या चौदा महिन्यांतील ५०० तासांचा कालावधी लागला.
लोकमान्यांचेे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते आज ही व्यक्तिचित्रे रमणबागेचे मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. शाला समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तैलरंग, जलरंग, पोस्टर कलर, पेन्सिल शेडिंग, कॅनव्हास पेंटिंग, पुठ्ठा, वर्तमानपत्रे, विविध प्रकारचे कागद, कोलाज, अ‍ॅल्युमिनियम, शाडू माती, फायबर, रंगीत सुतळी, रंगीत कागद, निब पेंटिंग, मेहंदी पेंटिंग, एम्बॉस, वाळलेले गवत, झाडांची पाने, कडधान्ये, पझल, रांगोळी, मोती, मणी आदी माध्यमांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यक्तिचित्रे साकारण्यात आली.

विविध वैशिष्ट्यपूर्ण कल्पनांच्या आधारे लोकमान्यांचा जीवन प्रवास चित्रबद्ध करण्यात आला आहे. शेंगांची टरफले, केसरी वर्तमानपत्राचे कोलाज, अक्षर गणेश, पझल, खादीचे कापड, कडधान्ये, झाडांची पाने आदी माध्यमांच्या सहाय्याने अनुक्रमे लोकमान्यांचे बालपण, केसरीची स्थापना, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, स्वदेशी, आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व आणि निसर्गरम्य सिंहगडावरील भटकंती हे प्रसंग रेखाटण्यात आले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू:शेतात खेळत असताना आई-वडिलांसमोरच ओढून नेले

शिरूर-जुन्नर सीमेवरील पारगावमधील घटना पुणे- जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या...

पुण्या पिंपरीत महायुती नाही, अजित पवार भाजपा विरोधात लढणार – मुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे- महापालिकेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन...

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला:मुंबईसह 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई:राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. त्यात...