अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उप जिल्हाधिकारी, महापालिका उपायुक्त आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Date:

प्रविण दरेकरांची मागणी

मुंबई : चिंता करणारी अशी इमारत दुर्घटना मुंबईच्या मालवणी (मालाड) परिसरात घडली असून त्यात १६ लोकांचा मृत्यू होऊन ८ जण गंभीर जखमी आहेत. या अनधिकृत बांधकामांबाबत व अशा घटना घडण्याची शक्यता असल्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी पूर्वीच महापालिका प्रशासनाला अलर्ट केले असताना महापालिकेने कोणतीही कारवाई न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असून त्यात निष्पापांचा बळी गेला आहे. याला भ्रष्ट महापालिका कारभार कारणीभूत आहे, अशी टीका काल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर केली.
मुंबईच्या मालवणी (मालाड) परिसरात काल इमारत दुर्घटनेत १६ लोकांचा मृत्यू झाला असून ८ लोक गंभीर जखमी आहेत. आज घटनास्थळाला दरेकर यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत खासदार गोपाळ शेट्टी हे देखील होते.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दरेकर म्हणाले, या परिसरात दोन-चार मजल्याच्या झोपडया उभ्या राहिल्या आहेत, त्या कधीही कोसळू शकतात आणि लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, हे यापूर्वीच खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिका प्रशासनाला लेखी पत्र देऊन कळवलं आहे. परंतु, दुर्दैवाने सरकारने आणि महापालिका प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, त्यामुळेच आज १६ लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. जेवढी अनधिकृत बांधकामे झाली किंवा झोपड्यांचा विस्तार ४- ५ माळ्याची बिल्डिंगमध्ये झाला, ते महापालिका, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीशिवाय किंवा आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकामाना जबाबदार असणाऱ्या महापालिका, पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील दरेकरांनी केली.

अधिवेशनात या भ्रष्ट कारभाराचा सोक्षमोक्ष लावणार
व्यवस्थेच्या भ्रष्ट कारभारामुळे ही घटना घडली, या बांधकामाला परवानगी दिली असेल तर कोणत्या नियामन्वये दिली, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची आवश्यकता होती, अनधिकृत बांधकामांबाबत काय कारवाई केली, वगैरे अनेक त्रुटी यामध्ये आहेत, याचाही सोक्षमोक्ष आम्ही येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लावू, हा विषय टोकाने सभागृहात मांडू, असेही दरेकर म्हणाले.

आवास योजनेत परिसरातील लोकांना सामावून घ्या
वास्तविक पाहता पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजना या ठिकाणी राबवून या गरिबांना हक्काचे व सुरक्षित घर देण्याबाबत शासनाने विचार केला पाहिजे. तसेच, मोठ्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या सुरक्षेची काळजी महापालिकेने घ्यावी, अशीही मागणी दरेकर यांनी केली.

प्रविण दरेकर आणि महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी समोरासमोर

प्रविण दरेकर हे मालवणी (मालाड) येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करीत असताना योगायोगाने महापौर किशोरी ताई पेडणेकर यांची घटनास्थळीच भेट घडून आली. यावेळी दरेकर यांनी ह्या भागात चार-चार माळ्याच्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहत आहेत, यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशा आशयाच पत्र खासदार गोपाळ शेट्टी यांनी देऊन देखील, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास आणून दिली.
या दुर्घटनेला कोण जबाबदार, यावर तर्कवितर्क लावत बसण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील दरेकरांनी केली. याविषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे व त्या बैठकीला आपल्यालाही बोलावण्याचे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दरेकर याना दिले.

दरेकरांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस

मालवणी (मालाड) इमारत दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर शताब्दी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच तेथील डॉक्टरांशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा आमदार योगेश सागर हे देखील होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...