आत्मनिर्भरतेच्या दिशेने लष्कराचे कार्य भारतीय लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी -लष्करप्रमुख

Date:

पुणे-पुण्यातील भारत फोर्ज आणि  एआरडीई यांचे  संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज  भेट दिली. यावेळी लष्कर प्रमुखांना  संरक्षणविषयक सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी, अल्ट्रा लाइट हॉविझर्स, संरक्षित वाहने, लहान शस्त्रे आणि दारूगोळा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने सशस्त्र सैन्याने स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून आपली हि भेट आहे असे जनरल एम.एम. नरवणे यांनी म्हटले आहे.

लष्कर प्रमुखांनी कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल अँड मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशनलाही भेट दिली. तेथे त्यांना थ्रीडी प्रिंटिंग, मानवरहित ग्राउंड व्हेइकल्स, नॅनो टेक्नॉलॉजी, एआय, थर्मल इमेजिंग इत्यादींची माहिती देण्यात आली.

आरमामेंंट  रीसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टेबलिशमेन्ट

(एआरडीई ) ही संरक्षण संशोधन विकास संघटनेची प्रमुख संस्था असून सैन्य दलाला जागतिक स्तरावरील शस्त्रास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याचे काम करते. एआरडीईच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुखांना एआरडीईने विकसित केलेल्या उपकरणे व दारूगोळा यांच्या प्रयोगात घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांवरील संशोधन व प्रगती आणि नवीन उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये एटीएजीएस, पिनाका, 10 मीटर फोल्डेबल ब्रिज, लेझर गाईड अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टम यांचा समावेश होता.
 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...