पुणे, 26 एप्रिल 2022
स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षांचे स्मरण करण्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 26 एप्रिल 2022 रोजी मिल्खा सिंग क्रीडा संकुलात (MSSC) लष्करी जवानांच्या पत्नींसाठी “फन रन” चे आयोजन केले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय लष्कराची दक्षिण कमांड सक्रियपणे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. त्याच हेतूने मिल्खा सिंग क्रीडा संकुलात “फन रन” ही दौड आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लष्करी जवानांच्या पत्नींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व वयोगटातील सहभाग म्हणजे या आधुनिक व्यस्त जगात महिलांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत जागरुकतेचा पुरावा होता. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (AWWA) च्या प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला.श्रीमती नैन आणि इतर ज्येष्ठ महिलांनीही या दौड मध्ये उत्साहाने भाग घेतला. अन्नू कुमारी यांनी या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांना स्पर्धेसाठी चषक देण्यात आला.

