नवी दिल्ली, 3 एप्रिल 2022
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (COAS) हे 04 ते 06 एप्रिल 2022 या तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या भेटीदरम्यान ते सिंगापूरच्या वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेतृत्वाची भेट घेणार आहेत.
04 एप्रिल 2022 रोजी, जनरल नरवणे क्रांजी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. लष्करप्रमुख सिंगापूरचे संरक्षण मंत्री, सिंगापूर लष्कराचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ मान्यवरांची भेट घेऊन भारत-सिंगापूर संरक्षण संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करतील.
लष्करप्रमुख इन्फंट्री गनरी टॅक्टिकल सिम्युलेशन आणि वॉरगेम सेंटर, प्रादेशिक एचएडीआर समन्वय केंद्र, इन्फो फ्यूजन सेंटर आणि चांगी नौदल तळालाही भेट देतील.

