पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा
करण्यात आला. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पोतदार-पवार व
महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मागील वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कर्मचारी, उत्कृष्ट
अधिकारी व उत्कृष्ट आगार यांचा यथोचित सन्मान करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पीएमपीएमएलच्या १५ आगारांमधून
उत्कृष्ट चालक, उत्कृष्ट वाहक, उत्कृष्ट यंत्रशाळा कर्मचारी, उत्कृष्ट चेकर टीम, उत्कृष्ट आगार व्यवस्थापक, उत्कृष्ट आगार अभियंता व उत्कृष्ट आगार यांची निवड करून त्यांना परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा,सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पोतदार-पवार व महाव्यवस्थापक सुबोध मेडसीकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.अशोक निवृत्ती मेमाणे (न.ता.वाडी आगार) यांना उत्कृष्ट चालक म्हणून तर भाऊसाहेब दशरथ होले (न.ता.वाडीआगार) यांना उत्कृष्ट वाहक म्हणून तसेच श्री. मनोहर मल्हारी कुंडले यांना उत्कृष्ट यंत्रशाळा कर्मचारी म्हणून सन्मानपत्र व रोख रक्कम रूपये ३,०००/- चे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चेकर टीम म्हणून श्री. अशोक हरिबा ठोंबरे (ए.टी.आय.), श्री. गणपत प्रल्हाद देवकर व श्री. सतिश मल्हारी शिंदे (कंट्रोलर कम चेकर) यांना सन्मानपत्र व रोख रक्कम रूपये १०,०००/- चे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शैलेंद्र विजय जगताप (भेकराईनगर आगार) यांना उत्कृष्ट आगार व्यवस्थापक म्हणून व श्री. विलास बबन मते (कोथरूड
आगार) यांना उत्कृष्ट आगार अभियंता म्हणून ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट आगार म्हणून भेकराईनगरआगारास ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पीएमपीएमएल चे सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांच्यासह कर्मचारी बंधू-भगिनी
उपस्थित होते. कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांनी सूत्रसंचालन केले.
‘पीएमपीएमएल’च्या उत्कृष्ट डेपो, कर्मचारी व अधिकारी यांचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणगौरव
Date:

