एफएसआरए पॅनेल्सच्या सदस्यपदी दोन माजी न्यायाधीशांची नियुक्ती

Date:

पुणे-– द फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स (एफआयएफएस), या फँटसी स्पोर्ट्सच्या भारतातील एकमेव नियमाक मंडळाने जस्टिस (निवृत्त) मुकुल मुद्गल, माजी प्रमुख न्यायाधीश, माननीय पंजाब आणि हरियाण उच्च न्यायालय आणि जस्टिस (निवृत्त) जी. एस. सिस्तानी माजी न्यायाधीश, माननीय दिल्ली उच्च न्यायालय यांची फँटसी स्पोर्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटी (एफएसआरए) पदावर नियुक्ती केली आहे. प्रख्यात कायदेतज्ज्ञ, न्यायाधीश (निवृत्त) ए. के. सिकरी, माजी न्यायाधीश, माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे एफएसआरचे अध्यक्ष आहेत.

एफएसआरए ही एफआयएफएस या भारतातील फँटसी स्पोर्ट्स उद्योगातील स्वतंत्र स्व- नियामक (सेल्फ रेग्युलेटरी) संस्थेने स्थापन केलेली स्वतंत्र तज्ज्ञांची समिती आहे. एफएसआरएकडे एफआयएफएसच्या नियामक पैलूंवर देखरेख करण्याची जबाबदारी असून त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो – 

  • सर्वोत्तम पद्दती, मापदंड, शिष्टाचार तसेच एफआयएफएस सदस्यांसाठी गेमिंग धोरणे तयार प्रचलित करणे.
  • एफआयएफएस चार्टरचा भंग होऊ नये यासाठी कडक नियमावली तयार करणे आणि भंग झाल्यास योग्य कारवाई करणे.
  • विस्तार करण्याच्या दृष्टीने तसेच भारतीय फँटसी स्पोर्ट्स उद्योग टिकावा यासाठी सरकारी भागधारकांसह संवाद साधणे. 
  • तक्रारीची प्रभावी हाताळणी करणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

एफआयएफएसचे अध्यक्ष श्री. बिमल जुल्का म्हणाले, ‘भारतीय फँटसी स्पोर्ट्स उद्योग सध्या नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. विस्तृत ज्ञान, प्रदीर्घ अनुभव आणि न्यायाधीश (निवृत्त) मुद्गल आणि न्यायाधीश (निवृत्त) सिस्तानी यांचे कौशल्य या सनशाईन क्षेत्राला मार्ग दाखवण्यासाठी व दीर्घकालीन विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सक्षम आहे.’

एफएसआरए पॅनेल सदस्यपदी झालेल्या नियुक्तीविषयी न्यायाधीश (निवृत्त) मुद्गल म्हणाले, ‘भारतीय कायदा, नियामक तत्वे आणि आपल्या संविधानाचे पालन केले जावे याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ म्हणून काम करण्याची आमची भूमिका असेल.’

पॅनेल सदस्यपदी झालेल्या नियुक्तीविषयी न्यायाधीश (निवृत्त) सिस्तानी म्हणाले, ‘पॅनेल सदस्य म्हणून एफएसआरएमध्ये रूजू होताना मला आनंद होत आहे. कायदेशीर बाबींविषयी सांगायचे झाल्यास फँटसी स्पोर्ट्सशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे व त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयासह भारतातील विविध न्यायालयांनी दिलेल्या वेगवेगळ्या निकालांनुसार कौशल्यपूर्ण खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या आर्टिकल १९ (१)(जी) अंतर्गत या सनशाईन क्षेत्राला व्यावसायिक निश्चितता मिळाली असून हा या कायद्याचा महत्त्वाचा भाग आहे.’

एफआयएफएस २०१७ पासून स्व नियमनाच्या जोरावर या उद्योगाचे नेतृत्व करत असून त्यांनी संचालकपदी जॉय भट्टाचार्य यांची नियुक्ती केली आहे. जॉय हे भारतीय क्विझर, निवेदक, लेखक आणि क्रीडा निर्माते आहेत. ते आयपीएल फ्रँचाईझी कोलकाता नाइट रायडर्सचे माजी टीम संचालकही होते. त्यांनी भारतात आयोजित करण्यात आलेल्या फिफा अंडर- १७ मध्येही संचालक म्हणून तसेच उद्घाटनपर प्रो व्हॉलीबॉल लीगमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे. त्याशिवाय क्रीडा उद्योगातील ज्येष्ठ उदा. प्रोफेसर रत्नाकर शेट्टी – माजी बीसीसीआय प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि श्री. अमृत माथुर- माजी सचिव, भारतीय क्रीडा अथॉरिटी हे ही एफआयएफएस सचिवालयाचे सल्लागार आहेत.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून उलगडणार  शहरीकरणाचे बदलते पैलू

'अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन' -  १६ ते...

पुण्यात अफूची शेती … पोलिसांची कारवाई. ४५ वर्षीय महिला अटकेत

पुणे-आळंदी म्हातोबाची या गावातील परिसरामध्ये अफु या अंमली पदार्थाची...