आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संजय काकड़े यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Date:

पुणे-माजी खासदार संजय काकडे यांच्यावर भाजपनं आता मोठी जबाबदारी सोपविली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय काकडे यांची आता प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांना दिलं आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन माजी खा. काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपची सत्ता आणण्यामध्ये काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, राज्यात भाजपचे सरकार गेल्यानंतर ते राजकीय घडामोडीपासून दूर गेले होते.

राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजपनं म्हंटलं आहे.

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखले जाते. मात्र दुसऱ्यांदा भाजपकडून काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही. त्यावेळी काकडे यांची उघडउघड नाराजी लपून राहिली नव्हती. पण आता प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकून काकडे यांची काही प्रमाणात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...