पुणे – संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियां गांधी आणि नेते राहुल गांधी आणि अ. भा. महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटाजी डिसूझा, ममता भूपेश (महाराष्ट्र प्रभारी) या सर्वांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली
संगिता तिवारी पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा तसेच पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस म्हणून काम केले आहे कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा पुढाकार असतो , तसेच अनेक वर्षे महिला बचत गट प्रदर्शन, व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसाय मार्गदर्शन, सामाजिक विषयावर शॉर्ट फिल्म फेस्टिवल असे अनेक उपक्रम कॉंग्रेस पक्षाचे अंतर्गत घेतले आहेत, कोरोना काळात श्रमिक रेल्वे मधुन जाण्यारया माइग्रेंट्स ला सर्व मदत पार्टीच्या बॅनर खाली केली,
संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, कॉंग्रेस पक्षाचे माध्यमातून महिलांसाठी काम करत राहीन असे मनोगत तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले
संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
Date: