ग्रामीण भागातील युवक व युवतींना कृषी व कृषीपुरक व्यवसाय विषयक प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि.२६:- पुणे जिल्हयातील ग्रामीण युवक / युवतींना कृषि विज्ञान केंद्र, बारामती, नारायणगाव, तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक / सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन त्वरीत नोंदणी करण्याचे आत्माचे
प्रकल्प संचालक यांनी आवाहन केले आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण -२०१५ अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण
देणे हा कार्यक्रम राबविणेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील युवकांना / महिलांना स्थानिक गरजेनुरुप कृषि व कृषि पुरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देणेसाठी तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण देणे हा कार्यक्रम राबविणेत येत आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी ७ दिवसाचे (६+१ प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी करीता प्रवास), प्रशिक्षण वर्ग क्षमता १५ प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग, (कृषि व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सुचनानुसार विशेष घटक योजनेंतर्गत अनु. जाती-४, अनु.जमाती-३ व उर्वरित सर्वसाधारण घटक-८ या प्रमाणात युवकांची निवड करण्यात येणार आहे)

सन २०२१-२२ अंतर्गत पुणे जिल्हयासाठी वरील निकषांनुसार दोन प्रशिक्षण कार्यक्रमांस मंजुरी मिळालेली आहे व नोडल प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आलेली आहे.

प्रशिक्षण संस्थेचे नाव कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, कौशल्य
प्रशिक्षणाचा विषय मधुमक्षिकापालन,
प्रशिक्षण कालावधी माहे सप्टेंबर २०२१,
कृषि विज्ञान केंद्र, बारामती, मधुमक्षिकापालन
माहे ऑक्टोबर २०२१ असे आहेत.

संपर्क क्रमांक-
कृषि विज्ञान केंद्र, बारामती डॉ. मिलिंद जोशी-९९७५९३२७१७

कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव डॉ. दत्तात्रय गावडे- ७०२०२१६४५३

३. प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे भ्रमणध्वनी क्र- ०२०-२५५३०४३१

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...