बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना 3 लाखापर्यंतची कामे विनानिविदा देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. १६ : पुणे महानगरपालिकेकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रास्ता पेठ पुणे या कार्यालयाकडे प्रत्येकी २ लाख प्रमाणे विविध प्रकारची एकूण ५ कामे बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना वाटपासाठी प्राप्त झाली असून अशा सोसायट्यांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना ३ लाखपर्यंतची शासकीय कामे विना निविदा देण्याबाबत शासन आदेश आहेत. त्यास अनुसरून पुणे जिल्हयातील कार्यरत असणाऱ्या व शासकीय कामे मिळण्यासाठी सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या तसेच या कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायटयांनी परिपूर्ण प्रस्तावासह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्तापेठ पुणे-११ या कार्यालयास दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पूर्वी आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा उ. पवार यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...