Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहन

Date:

मुंबई, दि. ३० : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक शासकीय व खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी तसेच या योजनेतून प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळ निर्मिती

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत आरोग्य क्षेत्र अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तथापि या क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे दिसून येते. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही कमतरता नसावी, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ योजना सुरु केली आहे. याअन्वये सर्व शासकीय रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था व 20 खाटांपेक्षा जास्त क्षमतेच्या खाजगी रूग्णालयांना आरोग्य क्षेत्रातील निवडक 36 अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याकरीता व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत प्रशिक्षणाचा भर हा प्रत्यक्ष कामकाजाअन्वये प्रशिक्षणावर (On Job Training) असणार आहे.

तसेच केंद्र शासनाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३ अंतर्गत विशेष प्रकल्वान्वये  Emergency Medical Technician– Basic, General Duty Assistant (GDA), GDA – Advanced (Critical Care, Home Health Aide, Medical Equipment Technology Assistant व Phlebotomist अशा संबंधित सहा जॉब रोल्सकरीता मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थाद्वारे अल्पमुदतीचे व प्रत्यक्ष कामकाजान्वये प्रशिक्षणावर (On Job Training) भर देणारे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

या योजनांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी मुंबईतील इच्छूक शासकीय, खाजगी रूग्णालये, शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना हे प्रशिक्षण विनाशुल्क असेल.

मुंबई उपगनर व मुंबई शहर जिल्ह्यातील रुग्णालये तसेच इच्छूक उमेदवारांनी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२६४४० व  ०२२-२२६२६३०३ यावर किंवा mumbaisuburbanrojgar@gmail.com अथवा mumbaicity.employment@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट...

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर,...