शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. 21:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू असल्यामुळे सन २०२१-२२ करिता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची ३१ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून पात्र विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/  या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर),  राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती,  गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत १४ शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

आर्थिक वर्ष माहे मार्च २०२२ अखेर असल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रत्येक पात्र विद्यार्थीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संचालनालयाच्या schol.dhepune@gov.in या ई-मेल पत्त्यावर तसेच ०२०-२९७०७०९८/२६१२६९३९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

अर्ज करतांना तांत्रिक अडचणीचे निराकारण करण्यासाठी विभागीय सहसंचालक कार्यालयनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईसाठी अधिक्षक अनिल रणधीर (९३७०१४६१५२/०२२-२२६५६६००/२२६९१५२८), पुण्यासाठी मुख्य लिपीक अरविंद भागवत (९४०४८७९७८८/०२०-२६१२७८३३/२६०५१६३२), पनवेलसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी युवराज साळुंके (९००४७१२००७/०२२-२७४६१४२०/२७४५३८२०), कोल्हापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी धैर्यशिल कारिदकर (७५०६३२३१२०/०२३१-२५३५४००/५३५४५४), सोलापूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास कदम (९८२२९०४८६७/०२१७-२३५००५५), जळगांवसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी राम राठोड (९४२२८६२८७३/०२५७-२२३८५१०), औरंगाबादेसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष थेरोकार (९४०४४८१७१८/०२४०-२३३१९१३/२३२२९१५), नांदेडसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश पाटील (८२७५५९०९४४/०२४६२-२८३१४४), अमरावतीसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी डॉ. प्रभु दवणे (९४२२८०९४१८/०७२१-२५३१२३५) आणि नागपूरसाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक बागल (७७५६८२२९१०/०७१२-२५५४२१०) या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा.

शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ५६ कोटी रुपये वर्ग

महाडीबीटी पोर्टलच्या डॅशबोर्ड अहवालानुसार २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर २ लाख १२ हजार १५३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून शिष्यवृत्ती योजनेसाठी १ लाख ७३ हजार ६२५ विद्यार्थी पात्र झालेले आहेत. आतापर्यंत १ लाख २९ हजार २७० विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी झालेल्या बँक खात्यावर ५६ कोटी ३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

सन २०२१-२२ मध्ये यावर्षी ३९ हजार १०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बँक खात्याशी आधार  क्रमांक जोडल्याशिवाय शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी आणि पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहनदेखील श्री.माने यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...