शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. 26 : आगामी दिवाळी उत्सवानिमित्त मावळ व मुळशी तालुक्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने मिळण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे. हे परवाने मावळ व मुळशी तालुक्यातील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी असतील.

परवान्यासाठी अर्जासोबत 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत नोंदणी उतारा अथवा  जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधिताचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेले संमतीपत्र, पोलीस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक यांचे दंड किंवा शिक्षा झाली आहे का याबाबतचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगर पालिकेने दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षी तात्पुरता फटाका स्टॉल परवाना घेतला असल्यास त्याची प्रत तसेच परवाना शुल्क सहाशे रुपये शासकीय कोषागारात जमा करुन त्याचे मुळ चलन अर्जासोबत जोडावे.

शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत ही 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू नये. राहिलेला माल कायम स्वरुपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, स.नं.23, बावधन बु. ता. मुळशी (जि. पुणे) यांच्यामार्फत हे परवाने देण्यात येणार आहेत.

दुकानांच्या परिसरात सुरक्षितता बाळगा

शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये, तसेच दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारुकाम करु नये, फटाके उडवू नयेत. शोभेच्या दारुचे रॉकेट परीक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेशही उप विभागीय दंडाधिकारी मावळ-मुळशी यांनी दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...