अपोलो हॉस्पिटल्समध्ये हृदय प्रत्यारोपण

Date:

मुंबई :  जागतिक अवयव दान दिनानिमित्त जगात प्रत्यारोपणाद्वारे जीवन देण्याचा चमत्कार साजरा होत असताना, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अखेरच्या टप्प्यातील हृदयरोगाचे निदान झालेल्या 33 वर्षांच्या पुरुषावर हृदय प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण केण्याची घोषणा केली. अवयव दानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी प्रत्येक वर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो.

 अपोलोचे ह्रदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन सल्लागार डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल हार्ट ट्रान्सप्लांट टीमने वाशीच्या एमजीएम रूग्णालयातून एका मृत देणगीदाराचे हृदय मिळवले आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये 33 वर्षांच्या पुरूष रुग्णावर त्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण केले. वाशीच्या एमजीएम रुग्णालयापासून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलपर्यंत हे हृदय खास ग्रीन कॉरिडॉरद्वारे 10 मिनिटांत 12 किमी अंतर पार करून आणण्यात आले. या हृदयाचा दाता एक 61 वर्षांचा पुरूष होता, ज्याचा मेंदू मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबियांशी अवयव प्रत्यारोपणाबाबत चर्चा करण्यात आली होती व त्यांनी त्यास मान्यता दिली होती.

 या हृदयाचा प्राप्तकर्ता अहमदनगर येथील 33 वर्षीय राजीव वाघमारे होता. त्याला पूर्वीपासूनच हृदयविकार होता. जून 2017 मध्ये त्याची छातीत दुखण्याची तक्रार आली आणि त्याला तातडीने अहमदनगरच्या वैद्यकीय केंद्रामध्ये नेण्यात आले. तेथे अँजिओग्राफी केली असता, त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे दिसून आले. त्याच्यावर तेथे उपचार करण्यात आले व डिस्चार्ज देण्यात आला. परंतु नोव्हेंबर 2017 मध्ये पुन्हा त्याने छातीत दुखणे आणि श्वासोच्छवासाची तक्रार केली. त्यावेळी त्याला मुंबईतील वैद्यकीय केंद्रामध्ये आणण्यात आले व तेथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली.त्यानंतर वारंवार आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांमुळे रुग्णाला अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हृदयाचे कार्य केवळ २० टक्के होत असल्याच्या अवस्थेत  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे त्याला पाठविण्यात आले. येथे हृदयविकाराच्या खास विभागात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये नोंदविण्यात आले. 27 जुलै 2019 रोजी त्याच्या शरीराला जुळणारे हृदय उपलब्ध झाले, तेव्हा सामान्य जीवन जगण्याची दुसरी संधी त्याला मिळाली. 27 जुलै रोजीच त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. सल्लागार व हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव आणि कार्डिओव्हॅस्क्युलर व थोरॅसिक सर्जन डॉ. शांतेश कौशिक यांनी हे प्रत्यारोपण केले.

 नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्समधील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, “नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे आज प्रथमच प्रत्यारोपित हृदयाचा ठोका एेकू आला आहे. हृदयविकारामुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या या रुग्णास केवळ औषधांवर जगावे लागत होते. त्याच्या हृदयाचे कार्य अगदी मर्यादीत होत असल्याने हृदय प्रत्यारोपण हाच अत्यावश्यक आणि एकमेव उपाय होता. त्याच्या शरिराला जुळेल असे हृदय मिळविण्यात तो भाग्यवान ठरला. मधमाश्या चावल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्यानंतर हृदयाचे कार्य कमी झाल्याने पुन्हा सतत झटके येण्याचे हे असले प्रकरण मी प्रथमच पाहिले आहे. वाघमारे याला दुसऱ्या  आयुष्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे, प्रत्यारोपणात कोणताही अडथळा न येता हा रूग्ण बरा झाल्याचे समाधान आम्हाला लाभले आहे.

 या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेस 90 मिनिटांचा वेळ लागला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. येथील अत्याधुनिक व विविध उपकरणांनी सुसज्ज अशा कार्डिओथोरॅसिक आयसीयूमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी विशेष स्वरुपाचे बेड आहेत, ज्यांमुळे रुग्णांना नर्सिंगची सेवा देणे अतिशय सोपे जाते, तसेच जंतुसंसर्ग टाळता येतो. राजीव वाघमारे हा रूग्ण आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाला, “जेव्हा माझे हृदय सतत अपयशी ठरत होते, तेव्हा मी सामान्य जीवन जगण्याची आशा गमावली होती. या जीवनरक्षक शस्त्रक्रियेकडून मला मोठ्या आशा व अपेक्षा आहेत आणि मी माझ्या कुटुंबासमवेत सामान्य जीवनात परत येण्याची वाट पाहत आहे. अपोलो हॉस्पिटलमधील टीमने माझी काळजी घेतल्याबद्दल व वेळेवर केलेल्या कृतीबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्यामुळेच मला आयुष्यात दुसरी संधी मिळू शकली. अवयवदान करण्यास सहमती देणाऱ्या देणगीदाराच्या कुटुंबाचा मी कायम कृतज्ञ राहीन. दुर्दैवी अपघातामुळे हरवलेल्या एका आयुष्यातून माझे आयुष्य निर्माण झाले, हा अत्यंत हृदयस्पर्शी विचार आहे. मी लवकरच सामान्य जीवनात परतण्यास उत्सुक आहे! ”

 नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे म्हणाले, “आमच्या रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यारोपण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची आणि अवयव प्रत्यारोपणाच्या कौशल्याची ही चाचणीच ठरली आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यात व त्यांना उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरविण्यात आम्ही सतत कार्यशील राहू.”हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णाच्या शरीराने हा नवीन अवयव नाकारू नये, यासाठी त्याला विशेष औषधे दिली जातात. त्यामुळे हे रूग्ण बरे होऊन दीर्घ आणि उत्पादक आयुष्य जगतात. अपोलो हॉस्पिटल्स समुहाला अशा ठणठणीत बरे झालेल्या आणि 10 वर्षांनंतरही चांगले आयुष्य जगणाऱ्या प्रत्यारोपित रुग्णांचे आशीर्वाद लाभले आहेत. या समुहाच्या हॉस्पिटल्समध्ये समर्पित मल्टी-डिसिप्लिनरी हार्ट ट्रान्सप्लांट टीम आहे. तीमध्ये ट्रान्सप्लांट सर्जन, ट्रान्सप्लांट कार्डियोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट / क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, पल्मनॉलॉजिस्ट, इन्फेक्टीव्ह डिसिज कन्सल्टंट्स, इम्यूनॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, प्रशिक्षित आयसीयू आणि वार्ड नर्स आणि एक संपर्क अधिकारी यांचा समावेश आहे. येथील अत्याधुनिक व सुसज्ज अशा प्रत्यारोपण केंद्रांमध्ये रुग्णांचे खास निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये अवयव स्वीकारण्यास रुग्णाच्या शरीराचा नकार आणि संसर्ग या गोष्टींबाबत खास खबरदारी घेतली जाते. इम्यूनोसप्रेसिव्ह थेरपीच्या या काळात जंतुसंसर्ग, अवयव नकार, मधुमेह आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारखी गुंतागुंत टाळण्यासाठी सावधपणे येथे काम करण्यात येते.

 अपोलो हॉस्पिटलबद्दल ..

डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नईमध्ये अपोलो हॉस्पिटल या नावाने भारतातील पहिले कॉर्पोरेट रुग्णालय 1983 मध्ये सुरू केले. अपोलो हॉस्पिटलमध्ये देशात सर्वात जास्त हृदयविषयक उपचार केले जातात. एक लाख साठ हजाराहून अधिक हृदय शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. तसेच कर्करोगावर उपचार करणारे जगातील ते सर्वात मोठे रुग्णालय आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करणारे ते जगातील एक प्रमुख केंद्र आहे. 2014-15 या एका वर्षात येथे दीड हजार अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

अपोलो हॉस्पिटल्स हा आशियातील सर्वांत मोठा व विश्वासार्ह आरोग्यसेवा पुरवणारा समूह म्हणून गणला जातो. या समुहातील 71 रुग्णालयांमध्ये 12 हजार बेड्स आहेत. 3300 औषधांची दुकाने, 90 हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रेटेलिमेडिसीनची 110 केंद्रे, 15 हून अधिक वैद्यकीय शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र असा हा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. आरोग्य विमा सेवांसह एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जागतिक प्रकल्प सल्ला सेवा केंद्रवैद्यकीय शिक्षण केंद्रेजागतिक क्लिनिकल चाचण्यांवर लक्ष केंद्रित करणारे तसेच सार्वजनिक आरोग्यविषयक अभ्यास करणारे संशोधन विभागस्टेम सेल आणि जनुकीय संशोधन हे उपक्रमही चालतात. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन शोध लावण्यात अग्रगण्य असलेल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये चेन्नई येथे प्रोटॉन थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण आशियाआफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडांमध्ये हे अशा प्रकारचे एकमेव केंद्र आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूह हा प्रत्येक व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या मोहिमेत लाखो नागरिकांच्या सतत संपर्कात असतो.

भारत सरकारने अपोलोच्या या अमूल्य योगदानाच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही काढले आहे. एखाद्या वैद्यकीय संस्थेसाठीचा हा एक दुर्मिळ स्वरुपाचा सन्मान अपोलोला लाभला आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांना 2010 मध्ये प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्स समुहाने 34 वर्षांपेक्षा जास्त काळ वैद्यकीय संशोधनजागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांत व्यतित केला आहे. आधुनिक वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी अपोलो हॉस्पिटल्स ही जगभरात उत्कृष्ट रुग्णालयांमध्ये गणली जातात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...