कॅनडामधील उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

Date:

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च पर्वती पुणे व आय.आय.टी.बॉम्बे ॲल्युमनी असोशिएशन,पुणे चॅप्टर आणि आय.आय.टी. ॲल्युमनी कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कॅनडामधील उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, श्री. प्रशांत श्रीवास्तव , संचालक,  इंटरनॅशनल सेनेका कॉलेज, टोरंटो, कॅनडा, श्री. सायमन केलट, मेंबर, ईमीग्रेशन कन्सल्टंट रेग्युलेटरी कौन्सिल, कॅनडा आणि डॉ.एन.बी.पासलकर, माजी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते  झाले. प्रशांत श्रीवास्तव यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना कॅनडामधील विद्यापीठांसह तेथील शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षणावर भर देतात. अधिकाधिक प्रात्यक्षिकांवर भर असलेल्या अभ्यासक्रमांना अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड आणि शैक्षणिक संस्थांचे उद्योगांशी असलेले सामंजस्य करार यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम शिकतानाच प्रात्यक्षिकाची संधी मिळते. त्यामुळे शिक्षणानंतर नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस शोधताना पालक, विद्यार्थ्यांचे काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष असायला हवे. विद्यापीठ कोणते आहे याची माहिती आपण स्वत: करून घ्यायला हवी. कोणता अभ्यासक्रम निवडावा, त्या अभ्यासक्रमातील विषय कोणते आहेत, या  अभ्यासक्रमातील बारकावे पाहून घ्यावे शिवाय अभ्यासक्रमाची उपयुक्तता कशी आहे. क्रेडिट किती आहेत. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्ती,संशोधनासाठी मिळणारे प्रोत्साहन हे कोर्सेस पूर्ण केल्यावर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी अशा विविध विषयावर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. तर सायमन केलट यांनी   कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथील कायमचे वास्तव्य  मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी  त्यामध्ये भाषा कौशल्य, शिक्षण, कॅनडामधील कामाचा अनुभव, नोकरीसाठी ठराविक कालावधीसाठी लागणारे वास्तव्य, एक्सप्रेस एन्ट्री यासाठी लागणारी कागदपत्रे, त्याची पूर्तता करण्यासाठी लागणारा कालावधी, उद्योजकासाठी लागणारे व्यापाराचे प्रमाणपत्र,फेडरल इन्व्हेस्टर प्रोग्रामच्या माध्यमातून वास्तव्य मिळविण्यासाठी काय काय बाबीची पूर्तता करावी  अशा विविध विषयावर विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, प्रशांत श्रीवास्तव, सायमन केलट, डॉ.एन.बी.पासलकर, डॉ. अशोक रानडे, विश्वास ढेकणे, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व   विद्यार्थी पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या चर्चासत्राचे नियोजन समन्वयक प्रा. शैलेश हजारे व डॉ. काशिनाथ मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा साळवेकर व प्रा. प्राजक्ता कचरे यांनी केले.Attachments area

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...