पुणे -अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या ISTE Student Chapter विभागाच्या वतीने इंजिनिअर डे चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात श प्रकाश जगताप मुख्य कार्यकारी संचालक साज टेस्ट प्लांट प्रा.ली. पुणे व डॉ.एन बी. पासलकर माजी संचालक तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. मोक्षगोंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या प्रसंगी बोलताना प्रकाश जगताप यांनी भारत सरकारने २०३० पर्यंत 'इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन' घडवण्याचा निर्धार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांनचा वापर करून शाश्वत परिवहन पद्धत विकसित करण्यासाठी संशोधन सुरु आहे. पेट्रोलियम पदार्थांवर अवलंबून असलेल्या वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे ई चार्जिंग स्टेशन, वाहनाचे सुटेभाग निर्मिती उद्योग, असेम्ब्ली एन्टरप्रायझेस, बॅटरी आणि चार्जिंग उपकरणे निर्मिती उद्योगाच्या संधी उपलब्ध होऊन नवउद्योजकाना संशोधनासाठी नवे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये नवनिर्माता म्हणून इंजिनिअरचे योगदान महत्वाचे आहे. सध्याच्या मंदिच्या काळात संधी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवभारताच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करून संशोधन करण्याचे आवाहन इंजिनिअर डे च्या निमित्ताने उपस्थितांना केले. इंजिनिअर्स डे च्या निमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांचा व महाविद्यालयातील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विदायार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या ‘पर्वती २०१९’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. ISTE विद्यार्थी प्रतिनिधी कु.भूषण नाडकर याने इंजिनिअर्स डे चे महत्व पटवुन दिले. कार्यक्रमासाठी प्रकाश जगताप, मुख्य कार्यकारी संचालक साज टेस्ट प्लांट प्रा.ली. पुणे, डॉ.एन बी. पासलकर, माजी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, ऋजुता जगताप कार्यकारी संचालक, साज टेस्ट प्लांट प्रा.ली., महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ISTE विद्यार्थी विभागाचे समन्वयक प्रा.संदीप राऊत व प्रा.सारंग दुबे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.वैशाली भिमटे व प्रा. प्राजक्ता कचरे यांनी केले.
तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करा…… प्रकाश जगताप
Date: