मुंबई- मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच शिवसेनेचे बंडखोर आमदार नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे वगळता भाजपच्या सर्व नेत्यांचे नावानिशी आभार मानले आहे .यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह्मंती अमित शाह ,जे पी .नड्डा, देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करून त्यांनी आभार मानले आहेत .
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून देखील शिंदे यांनी केलेल्या ट्वीट मध्ये मात्र हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध… असे म्हटलेले आहे .
राज्यपालांकडे जातानाही त्यांच्या समवेत कोणीही शिवसेना आमदार नव्हते सर्व भाजपचे नेतेच होते. तिकडे गोव्यात त्यांचे अन्य सहकारी बंडखोर आमदार नाचत जल्लोष करत होते त्यानंतर मात्र त्यांनी गोव्यातील आपल्या सहकारी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरस द्वारे संपर्क करून या संदर्भात संवाद साधला .


