पुणे-कात्रज बोगद्यातून नवले ब्रिजकडे येताना भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. टेम्पोने तबल 8 वाहनांना उडविले आहे. वाहनांचा चक्काचुर झाला आहे. सकाळी साडे सातच्या दरम्यान हा अपघात झाला.विद्याधर शंकर साळुंके (वय 68, रा. प्लॉट न ८२ अध्यापक कॉलनी सहकारनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टेम्पो चालक पसार झाला आहे. टेम्पोचा क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (क्रमांक- DD. 01. C. 9467) हा दिऊदमनचा आहे. सुरुत येथून भाजीपाला घेऊन टेम्पो मुंबईत जात होता. कात्रज बोगद्यातून नवले ब्रिजच्या दिशेने मुंबईकडे जात असताना अचानक उतारावर हॉटेल विश्वाससमोर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पोने समोरील 3 रिक्षा व 4 कारला उडविले. यात काही रिक्षा आणि कार पार्क केलेल्या होत्या. यात साळूखे यांच्या कारला जोराची धडक बसली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. तर खान हे देखील त्यांच्या कारने जात असताना त्यांना उडविले आहे. यात त्यांच्या कारचा चुराडा झाला आहे. खान हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साळुंखे हे स्कुल व्हॅन चालक आहेत. सहकारनगर येथे ते राहतात. सकाळी ते मित्रांना भेटण्यासाठी कार घेऊन निघाले होते. त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

