अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची’ घोषणा

Date:

मुंबई- नगरपालिका क्षेत्रामध्ये सलग ५ वर्षे आयोजित केला गेलेला हा एकमेव चित्रपट महोत्सव असून मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये या महोत्सवाने मानाचे स्थान प्राप्त केले आहे. २०२० मध्ये निर्मिती झालेले प्रदर्शित/ अप्रदर्शित मराठी चित्रपट या महोत्सवासाठी पात्र असतील व त्यांचे परिक्षण झाल्यावर नामांकन यादी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण निकषांसोबतच चित्रपट निर्मितीशी निगडित विविध तंत्रज्ञांचा समावेशही पुरस्कार नामांकनांमध्ये केला जातो. या संदर्भात चित्रपटसृष्टीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या  ‘स्पॉट दादांचा’ सन्मान हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

यावर्षीचे विशेष घोषित पुरस्कार पुढील प्रमाणे :

जीवन गौरव पुरस्कार–  ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर

कारकीर्द सन्मान विशेष पुरस्कार – श्रीकांत मोघे

तंत्रज्ञ गौरव पुरस्कार – ज्येष्ठ संकलक व्ही एन मयेकर

सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार– गणेश आचवल

आजपर्यंत रवी पटवर्धन, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोर नांदलस्कर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या महोत्सवाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध पटकथा लेखक, दिग्दर्शक महेंद्र पाटील यांचे आहे. महोत्सव संस्थापक सुनील चौधरी आणि आयोजक निखिल चौधरी आहेत.

यावर्षीचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव हा ‘कोविड नियम संकेतानुसार’ आयोजित करण्यात येत आहे.दरवर्षीप्रमाणेच मराठी मनोरंजन सृष्टीतील  नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणामुळे अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव – २०२० ची रंगत वाढणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...