पुणे- पुण्यातील रस्ता रुंदीच्या जागा ,ओढे , नाले , ड्रेनेज यावर कोणी अतिक्रमणे केली , कोणी ती बळकावली हे नावानिशी जाहीर करावे असे खुले आव्हान भाजपाला करत नंतर पुणे कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या कारभाराने तुंबले असा आरोप कर्नर म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.
भाजपा ने अशी अवस्था केली आहे की,विद्या उद्यम कला संस्कृती इथे सगळेच उणे,उभ्या भारता शरम वाटे, असे खड्डे अन पाण्यातील पुणे.
अशी उपमा देत तिवारी यांनी भाजपचे पदाधिकारी यांनी केलेय आरोपांवर प्रतिहल्ला चढविला आहे,त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ खूप मोठा पाऊस झाला आणि पुण्या च्या सर्व रस्त्यांचे रूपांतर नदयां मध्ये झाले . पुणेकर नागरिक त्रस्त झाले. रस्त्याने लोकांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या. भर दिवाळी मध्ये रस्त्यावरील गरीब फेरीवाल्यां च्या व्यवसायाचे नुकसान झाले. ही परिस्थिती फक्त आणि फक्त भाजपा मुळे झाली . ह्यांचा १ खासदार, ६ आमदार , आणि १०० नगरसेवक काय झोपा काढत होते का ? भाजपा पुणे शहर अध्यक्ष मुळीक आणि माजी महापौर मुरली मोहोळ सरळ प्रेस घेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला जबाबदार पकडतात, हे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत . भाजपा वाले इतके वर्ष महापालिकेत सत्तेत होते , मग काय करत होते हे, पुण्याचा विकास का पुण्याचा ऱ्हास, पुण्यात यापूर्वीही ही खूप प्रचंड पाऊस झाला होता, २/३ दिवस पाउस सतत जोरदार बरसत होता , पण अशी अवस्था कधीच नव्हती झाली. ह्यांनी स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली आणि ठेकेदारा कडून स्मार्ट पाकिटे घेतली का मग?मी खुला चॅलेंज देते मा मुळीक आणि मोहोळ यांना; ते प्रेस मध्ये म्हणतात ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांनी ओढे नाल्या च्या जागा ताब्यात घेतल्या .खोटे बोल पण रेटून बोल ही यांची संस्कृती. अहो द्या की आम्हला नावा सकट यादी. किती खोटे बोलावे आणि पुणेकरांची दिशाभूल करावी. महापालिकेतील बरेच ठेकेदार काळ्या यादीत टाकले आहेत परंतु हे भाजपाचे नेते मग त्यात पालकमंत्री असोत , मुळीक असोत, मोहोळ असोत …हे महापालिका आयुक्त यांना कारवाई करू देत नाहीयेत. विचारा की यांना हे कशासाठी चालू आहे. पुण्याचा विकास काळ्या यादि तले ठेकेदार करणार का आता? का पाकिटा चा आणि हितसंबंधांचा विषय आहे ? करा खुलासा. पुणे पूर्ण पाण्यात गेले, पुणे तुंबले तुमच्या मुळे. सगळ्यात जुना जंगली महाराज रोड ही तुम्ही तुंबवला .. सगळीकडे सिमेंटच्या रस्त्याची टेंडर काढून. चांगले रस्ते खोदून काढले टक्केवारीच्या साठी… ठेकेदाराची आणि स्वतः ची घरे भरली. पुणे गेले पाण्यात , जनता गेली खड्यात. आणि वर बेशरम पणे काँग्रेस आणि राष्च्याट्रवादीच्या नावाने खडे फोडत आहेत. महापालिकेतील काळ्या यादीतील ठेकेदारांची नावे प्रसिद्ध करा की . का आयुक्त यांच्यावर थेट मुख्यमंत्री आणि पालक मंत्री यांच्या कडून प्रेशर आणत आहेत. कुठे तरी पाणी मुरतंय हे न समजायला पुणेकर काही वेडे नाहीत. तेव्हा उगाच काँग्रेस वर खोटे आरोप करू नका, आपले शब्द मागे घ्या नाहीतर नावे प्रसिद्ध करा. पुण्याचे रस्ते पाहून नागरिक आता तुम्हाला रस्त्यावर आणतील. पुण्यातील रस्त्यावरील खड्डे पाहून पुणेकर आता तुम्हाला त्याच खड्ड्यात टाकतील. आणि हो पुण्याचे जे रस्ते तुम्ही तुंबवले ना त्याच तुंबवणी मध्ये तुम्हाला बसवतील हे लक्षात घ्या. सामान्य माणसाच्या सहनशक्तीचा अंत बघू नका? एक लक्षात घ्या सामान्य माणसा कडे गमवायला काही नसते परंतु तुम्ही खूप काही गमवून बसाल.तेव्हा मी एक काँग्रेस ची कार्यकर्ती म्हणून तुम्हाला आव्हान करते पुराव्या शिवाय आरोप करून काँग्रेस ला बदनाम करायचा अजिबात प्रयत्न करू नका. आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका. पुण्याचे वाटोळे हे भाजपा च्या नेत्यांनी च केले आहे हे पुणेकरांना कळले आहे.असे संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.

