शिवभोजन थाळी ठरली अन्नपूर्णा…..!!

Date:

कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंग मुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच शिवभोजन थाळी मुळे अनेकांच्या जगण्याला मोठा आधार मिळाला…एक प्रकारे ती अन्नपूर्णा ठरली… त्या संदर्भात पुणे जिल्ह्यातील शिवभोजन थाळीचा हा आढावा…!!

            राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. पुणे जिल्हयात 15 एप्रिल 2021 पासून 10 मे 2021 अखेर 74 केंद्रातून एक लाख 93 हजार  253  लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराधारांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे.       

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी “शिवभोजन” थाळी योजना सुरू करण्यात आली. 26 जानेवारी 2020 पासून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ झाला.  गतवर्षी टाळेबंदीच्या कालावधीत आधार ठरलेली ही योजना यावर्षीच्या टाळेबंदी कालावधीतही आधार ठरली आहे.

पुणे जिल्हयात शिवभोजन थाळींची तालुकानिहाय संख्या, कंसात शिवभोजन केंद्र

आंबेगाव-14,599(4),जुन्नर-16,377 (7),खेड-8,390 (6),मावळ-15,176 (6),मुळशी-8,012 (7),शिरूर-11,036(5),भोर-14,979 (3),पुरंदर-19,609 (4),वेल्हे-3636 (1),दौंड-10,063(5),बारामती-30,986(13),इंदापूर-15,901(5),हवेली-24,490(8) अशा एकूण 74 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 1 लाख 93 हजार 253 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

‘‘पुणे जिल्हयात 15 एप्रिल 2021 पासून 10 मे 2021 अखेर 74 केंद्रातून एक लाख 93 हजार  253  लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराधारांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे. ’’

भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर...

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २४६ पैकी १२८ नागरिक सुखरूप परत

९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही पुणे, दि....

पार्थ पवार यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज

मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजितदादा...