पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या संचालक आण्णा जोगदंड यांच्या प्रयत्नातुन अनाथ मुलांना दिवाळी फराळ देवून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या . या प्रसंगी ते बोलताना ते म्हणाले की, समाजात भिषण विषमता आहे.गरीबीने, तर कधी परस्थितीमुळे अडचणीत येवून मुलांना सांभाळ न करु शकणाऱ्या तसेच अनाथ मुलांना माहेर या संस्थेत प्रवेश दिला जातो. ते त्यांना आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर, आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो? याचा विचार करायला हवा, अस स्वयंम रोजगाराचे प्रशिक्षण देवून …जगात अशक्य काहीच नसते असी उर्जा त्यांच्यात निर्माण करते आणि स्वताच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला जा तो. या मुलांना कधीच ते एकटे नाहीत असे दर्शवून , दिपावलीच्या आनंद उत्सवात त्यांना शुभेच्छा बरोबच फराळ दिला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , संचालक संजना कपुर , सल्लागार अनिल कदम , पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीचे पदाधिकारी दत्तात्रय घोरपडे, जितेन जेतवान, जोशी मँडम ,वसंत चटके, सदाशीव जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.