Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबईच्या डबेवाल्यांची ‘मुक्ती फ्रीडम परेडला साथ!

Date:

एचआयव्हीबद्दल जागरुकता पसरविण्याच्या बाबतीत, स्मिता ठाकरे यांची ‘मुक्ती ही नफारहित संस्था नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. ह्या संस्थेला गेल्या दोन दशकांपासून सातत्याने एचआयव्ही आणि एड्सच्या प्रति जागरूकता टिकवून ठेवण्यासाठी, नवीन सर्जनशील मार्ग शोधण्यासाठी तसेच सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनांनी जागतिक पातळीवर सन्मानित केले गेले आहे.
1 डिसेंबर रोजी ‘फ्रीडम परेड’ आयोजित करण्यात आली आहे, जेथे स्मिता ठाकरे, सनी लियोन आणि निशा हराले एलजीबीटीक्यू + समुदायांमध्ये एचआयव्ही जागरूकता पसरविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
स्मिता ठाकरे म्हणतात की , “आता वेळ आली आहे की आपण सर्व समुदायांसह एकत्र येऊन एड्सबद्दल जागरुकता पसरवावी, जीवनाचा पूर्ण आनंद घ्यावा, पण सर्व सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे फक्त एकचं आयुष्य आहे. ‘फ्रीडम परेड’ येथे मला आणि माझ्या मुक्ती फाऊंडेशनच्या टीममध्ये सामील व्हा आणि शब्द पसरवण्यासाठी संदेश पसरवा, ना की आजार.”
 एचआयव्ही आणि एड्सच्या रुग्णांच्या बाबतीत, भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो म्हणजे सुमारे २१ लाख एचआयव्ही ग्रस्त रुग्ण भारतात वावरतात. अशा परिस्थितीत, देशभरात जागरुकता पसरविण्याची प्रचंड गरज आहे. भारतात, एचआयव्ही पसरण्याचा सर्वात मोठा आणि सामान्य कारण म्हणजे शारीरिक दूषितता २०१७-२०१८ या एका वर्षात ८६.१ टक्के लोक या रोगाचे बळी ठरले आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत २०१७-२०१८ मध्ये 116 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले, जे एचआयव्हीचा प्रभाव कसा वाढत आहे हे दर्शविते. ही फक्त अधिकृत आकडेवारी आहे, वास्तविक संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतातून एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही दिसून येते.
या वर्षी मुक्तीने एचआयव्हीविषयी जागरुकता पसरवण्यासाठी एक अद्वितीय पुढाकार घेतला आहे. मुंबईतील डबेवालयांच्या विस्तृत नेटवर्कची मदत घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईतील सर्व डबेवाले लाल कपडे घालून दक्षिण मुंबईमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या प्रत्येक डब्याला टॅग्ज जोडण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. डब्याला जोडल्या गेलेल्या प्रत्येक टॅगमध्ये अशा काही तथ्यांचा उल्लेख केला जाईल जो एचआयव्हीबद्दल जागरुकता पसरविण्यास आणि त्या मोहिमेमध्ये लोकांना सहभागी करण्यास मदत करेल.
आमचा अपील आहे की आपण आमच्या मोहिमेत सामील व्हा आणि समाजाशी संबंधित या गंभीर समस्येचे निराकरण करण्यात मदत करा, कारण एचआयव्हीपासून मुक्त होण्याचा पहिला मार्ग जागरूकता आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट...

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर,...

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट...