पुणे-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सिंगापूर दौऱ्यात पुणे मेट्रो रिजन व नागपूर मेट्रो रिजनच्या विकास नियोजन साठी सुबर्ना ज्युरांग ह्या कंपनीचे सहकार्य घेणे तसेच पुण्यातील प्रस्तावित नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सिंगापूर मधील चांगी विमानतळ कंपनी चे सहकार्य घेणे असे दोन महत्वपूर्ण करार करण्यात आले. ह्या दोन्ही करारांमुळे पुणे मेट्रो रिजन आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीस सहकार्य मिळणार असून त्यानिमित्ताने खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानले. भेटी दरम्यान पुणे मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या दोन्हींचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असल्याचे शिरोळे ह्यांनी सांगितले.