पुणे-
मुंबईतील एल्फिस्टन रोड स्टेशन वरील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थनाकाचे प्रवासी सुरक्षाच्या दृष्टीने परीक्षण करण्याची मागणी खा. अनिल शिरोळे ह्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे रेल्वे प्रशासन तर्फे करण्यात येणार्या विविध कामांचा आढावा शिरोळे ह्यांनी विभागीय रेल्वे अधिकारी बी के दादाभोय ह्यांच्या समवेत विस्तृत बैठकीत घेतला.
बैठकीनंतर शिरोळे ह्यांनी रेल्वे अधिकार्यांना बरोबर घेऊन सध्याच्या प्रवासी पादचारी पुलाची पाहणी, स्कायओवर ब्रिज चा उपयोग वाढविण्यासाठी च्या उपाय योजना, तसेच नवीन पादचारी पूलाच्या कामाची प्रगति आदि विविध कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी देखील केली. “प्रवासी सुरक्षा आणि प्रवासी सुविधा” ह्या संबंधी चालू व प्रस्तावित असलेल्या दोन्ही कामांची सद्यस्थिती बाबत एक विस्तृत अहवाल रेल्वे प्रशासनाने तातडीने सादर करावा अशी मागणी बैठकीत केली असून हा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार असल्याचे ही शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.