पुणे -शहराच्या हद्दीतील कॅन्टोमेंट बोर्डातील रस्ते वापरावरील बंदीसंदर्भात नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ह्यांचा कडे जून २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर देखील ह्याच विषयी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ह्यांचे कडे देखील पाठपुरावा चालू होता तसेच ह्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी देखील मनोहर पर्रीकर , सुभाष भामरे ह्यांच्या समवेत शिरोळे ह्यांनी केली होती. ह्याच संदर्भात मध्यंतरी देशभरातील कॉन्तेन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशातील ६३ बोर्डांच्या लोकप्रतिनिधी बरोबर दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांच्या अध्यक्षतेखाली (4 मे २०१८) बैठक घेण्यात आली होती . ह्या बैठकीत पुणे शहरातील कॅन्टोमेंट बोर्डांच्या विविध प्रश्नांसंबंधी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणे कॅन्तोंमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी तसेच देहूरोड बोर्डाचे अभय सावंत ह्यांच्या समवेत दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीताराम ह्यांची भेट घेऊन बोर्डांच्या संबंधी विविध प्रश्नांवर चर्चा देखील केली होती. ह्या बैठकी नंतर संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय पातळीवर ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील टप्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी भेटीनंतर बोलताना दिली होती.
त्यानुसार झालेल्या विस्तृत आढाव्या नुसार कॅन्टोमेंट बोर्ड मधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी मान्य केले असून यापुढील काळात रस्ते संबंधी सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्रालाय्तील मार्गदर्शक तत्वे ह्यांचा आधार घेऊन पुढील काळात रस्ते वापर संबंधी कार्यवाही करण्याचेही निश्चित झाल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी कळविले आहे. तसेच मागील दोन वर्षांहून अधिक काल घेतलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल शिरोळे ह्यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.