पुणे-केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे गरीब, युवक आणि समाजातील सर्व घटकांसाठी समर्पित सरकार असून उज्वला योजनेद्वारे गोर गरीब वर्गातील महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडले असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे ह्यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार तर्फे देशभरात आज ग्राम स्वराज अभियान अंतर्गत “उज्वला दिवस” ह्या कार्यक्रम अंतर्गत पुण्यात आयोजित कार्यक्रमात नवीन gas जोडणी वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी एम एन जी एल चे संचालक राजेश पांडे, भारत पेट्रोलियम चे संजयकुमार चौबे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, हिंदुस्तान पेट्रोलियम चे राजन पत्तन, ओ एन जी सी चे एस पी सिंग, एस के साहू सुमन कुमार आणि गोपाल शंकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात अर्चना कांबळे, सोनाक्षी दहिभाते आदि लाभार्थींनी उज्वला योजना बद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले.
देशातील प्रतेय्क नागरिकाला gas, वीज स्वत:चे घर मिळवून देणे हि केंद्र सरकारची प्राथमिकता असल्याचे नमूद करून शिरोळे म्हणाले,” जण धन योजने द्वारे भ्रष्टाचाराला पायबंद बसला असून नागरीकांना त्याच्या हक्काचे पैसे थेट बँकेत जमा होऊ लागले आहेत. उज्वला योजनेला मिळालेला देशभरातील प्रतिसाद ( एकूण कोटी ५९ लाख ८७ हजार) बघता हि एक लोक् चळवळ झाली आहे. ह्या चळवळीच्या माध्यमातून पुणे शहराला केरोसीन मुक्त करावयाचे आहे. एम एन जी एल चे संचालक राजेश पांडे म्हणले,” पूर्वी gas कनेक्शन साठी लांबच लांब रांगा लागायच्या. पण मोडी सरकारच्या काळात फक्त ३ वर्षात ३.५ कोटी हून अधिक कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील उज्वला योजनेच्या नोडल अधिकारी अनघा गद्रे म्हणाल्या ,” आज पर्यंत पुणे जिल्ह्यात ६७,००० जोडण्यांचे वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्याचे वाटप करण्यात आले आहे. एकूण जोडण्यांपैकी ४४% जोडण्या ह्या SC/स्ट वर्गातील महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३.०८ लाख लोकांनी gas चे सबसिडी सोडली आहे. आज उज्वला दिवस अंतर्गतपुणे जिल्ह्यात एकूण ९४० नवीन जोडण्याचे वितरण करण्यात आले आहे. अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, SC/ST प्रमाणपत्र धारक, अति मागास जातीतील नागरिक हे देखील ह्या योजानसे पात्र आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १८० वितरक असून त्यापैकी नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी ह्या वितरकांशी संपर्क साधावा.”

