पुणे-खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकाराने प्रस्तावित नवीन पुरंदर येथील विमानतळासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा ह्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत एक आढावा बैठक घेण्यात आली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर एन चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदि ह्या बैठकीत उपस्थित होते. ह्या बैठकीत विमानतळाच्या प्रस्तावित जागेसाठी सध्या अस्तित्वात असणारे जोडरस्ते, प्रस्तावित रिंग रोड तसेच रेल्वे आणि मेट्रो ह्यांची विमानतळास जोडणी इत्यादी विषयांवर चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.