पुणे -शहरातील रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खा अनिल शिरोळे ह्यांनी आज महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे “ विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर ह्यांच्या सोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. त्यानुसार एस आर ए योजना राबवून ह्या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ह्या रेल्वेमार्गावरील स्वच्छतेसाठी निधी रेल्वे का मनपा यांनी खर्च करावा यासंबंधी देखील ह्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. ह्या बैठकीस नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे देखील उपस्थित होते.