पुणे-पुण्यातील मुळा मुठा नदी सुधारणा संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या “जायका” प्रकल्पाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या पुढाकारातून केंद्रीय विद्यान व तंत्रद्यान मंत्री हर्षवर्धन ह्यांच्या समवेत दिल्लीत एक विस्तृत बैठक झाली होती . बैठकीत ठरल्यानुसार भारत सरकारच्या NRCD (राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय ) आणि जपान मधील JICA ( Japan International Corporation Agency) ह्या दोन्ही संस्थांमार्फत प्रकल्प सल्लागार नेमण्याचे नक्की करण्यात आले होते. त्यानुसार लंडन स्थित मेसर्स पेल फ्रिचमन (लीड पार्टनर) ह्यांची नेमणूक करण्यात असून त्यासंबंधीचे अधिकृत पत्र 15 डिसेंबर रोजी संबधित मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याची माहिती खा. अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री हर्षवर्धन ह्यांचे आभार मानतानाच सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे “जायका” प्रकल्पची अंमलबजावणी तातडीने पूर्ण होईल असा विश्वास शिरोळे ह्यांनी व्यक्त केला.

