पुणे-साहित्यिक कट्टा वारजे आयोजित जागतिक मराठी भाषा दिना निमित्त मराठी भाषा अध्यापकांचा सन्मान आणि ”मराठी आमची असे मायबोली” या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदिप धुमाळ ,प्रदिप उर्फ बाबा धुमाळ, वा दा. पिंगळे उपस्थित होते
यावेळी प्रा. मिलिंद जोशी बोलताना म्हणाले समाजाविषयी आस्था आणि आपुलकी असणारे नगरसेवक असतात पण इथे साहित्यिक उपक्रम झाले पाहिजे समाजाच्या वैचारिक भरण पोषण झालं पाहिजे असं वाटणारी लोकप्रतिनिधि फार कमी असतात प्रदीप धुमाळ आणि दिपाली धुमाळ हे समाजसेवेला संसार मानणारी मंडळी आहेत त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित रहायला मिळाले याचा मला आनंद झाला
प्रा. जोशी पुढे म्हणाले मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या मला महाआघाडी सरकारचे खरोखरच कौतुक वाटते की आपले मंत्री मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा एवढा एकच मुद्दा घेऊन दिल्लीला जाऊन सांस्कृतिक मंत्रालयात भेटले ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं वाटत असेल तर राजकीय इच्छाशक्तिचा प्रभाव जास्त महत्त्वाचा आहे आमच्या साहित्य क्षेत्रातील काही टीकाकार असे म्हणतात की आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळून काय करायचे त्यासाठी येणार पचाशे कोटी त्याच्यावरती सगळ्यांचा डोळा असेल साहित्य परिषद म्हणून आम्ही नेहमीच भूमिका मांडत आलो त्या पाचशे कोटींशी आम्हाला काही घेणं देणं नाही शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आमचा अभिमान आहे आणि तो आमच्या अस्मितेशी निगडित आहे असे मिलिंद जोशी यावेळी म्हणाले
आदर आणि विश्वास संपादन करणारे शिक्षक जुन्या काळामध्ये होते आणि आजही आहे मला त्याचा विशेष आनंद होतो आणि त्यामुळे मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती जपायची असेल तर तो संस्कार शालेय जीवनापासून होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांची आणि पालकांची दोघांची जबाबदारी महत्त्वाची आहे असे ही मिलिंद जोशी यावेळी म्हणाले
आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा आणि आपण मनापासून त्याविषयी प्रेम निर्माण केले पाहिजे मराठी भाषा दिन हा एका दिवसापुरता साजरा न होता वर्षभर साजरा व्हावा अशी अपेक्षा दिपाली धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केलीआपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा रुजविण्याचे काम शिक्षक करत असतात आणि त्यांनी या कामात खंड पडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रदीप धुमाळ यावेळी प्रस्ताविकात म्हणाले

