अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला आता आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलचे संचालक

Date:

मुंबई: आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजकता व व्यवसाय उभारणीचा समृद्ध व वैविध्यपूर्ण अनुभव अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांच्याकडे आहे. संचालक मंडळाला विश्वास वाटतो कीत्यांचे आधुनिक विचारदृष्टिकोन आणि व्यवसायिक कौशल्यांचा फायदा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलला मिळेल.

आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितलेआदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने अनेक विविध कॅटेगरीज व फॉरमॅट्समध्ये फॅशन ब्रँड्सचा एक मजबूत पोर्टफोलिओ उभारला आहेज्यामध्ये भारतातील कपडे बाजारपेठेतील जवळपास सर्व प्रमुख सेगमेंट्सचा समावेश आहे. गेल्या काही वर्षातकंपनीने एथनिक वेअरसारख्या नव्याने उदयास येत असलेल्या विविध सेगमेंट्समध्ये देखील प्रवेश केला आहेआपले डिजिटल व्हेंचर टीएमआरडब्ल्यूमार्फत भारतीय डिझायनर्सलक्झरीस्पोर्ट्सवेअर आणि आधुनिक काळातील उद्योगांसोबत भागीदारीचा देखील यामध्ये समावेश आहे. आता आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल प्लॅटफॉर्म लक्षणीय वृद्धीच्या नव्या लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज आहे. अनन्या आणि आर्यमान यांनी स्वतः निवडलेल्या क्षेत्रात मिळवलेले उत्तम वैयक्तिक यश आणि त्यांच्या स्वतंत्र उद्योगांमध्ये खूपच कमी कालावधीमध्ये मिळालेले यश यामुळे आता ते मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार आहेत. आधुनिक काळातील बिझनेस मॉडेल्स व ग्राहकांच्या सवयीआचरणातील नवे बदल याविषयी त्यांना असलेली गहिरी समज यामुळे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळात नव्या ऊर्जेचा संचार होईल.” त्यांनी पुढे सांगितले, “उद्योगसमूहाची मूल्ये अनन्या व आर्यमान यांच्यात खोलवर रुजलेली आहेत आणि उद्योगसमूहाच्या उद्दिष्टांवर त्यांचा ठाम विश्वास आहे. मला पक्की खात्री आहे की ते या उद्योगसमूहाच्या समृद्ध उद्योजकता परंपरांचा वारसा पुढे चालवतील आणि हितधारकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड समर्थपणे पुढे नेतील.”

अनन्या बिर्ला व आर्यमान विक्रम बिर्ला यांची नुकतीच आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली. आदित्य बिर्ला ग्रुपमधील व्यवसायांना धोरणात्मक दिशा दाखवण्याचे काम करणारी ही सर्वोच्च कंपनी आहे.

यशस्वी महिला उद्योजिका श्रीमती अनन्या बिर्ला या प्लॅटिनम सेलिंग आर्टिस्ट आहेत. त्यांनी त्यांची पहिली कंपनी स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड वयाच्या १७ व्या वर्षी सुरु केली.  आज तिचा समावेश भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या एमएफआयमध्ये होतो.  १ बिलियन युएसडीचे एयुएम या कंपनीने पार केले असून १२०% सीएजीआरने (२०१५-२०२२) वाढ केली आहे. ७००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क हा खिताब देखील देण्यात आला आहे.  क्रिसिल ए+ रेटिंग मिळालेली स्वतंत्र ही या क्षेत्रातील सर्वात नवी आणि सर्वाधिक रेटिंग मिळालेली कंपनी आहे.  २०१८ साली स्वतंत्रने मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला यशस्वीपणे अधिग्रहित केले.  संपूर्ण व्यवसायात श्रीमती अनन्या यांनी आणलेल्या नाविन्यामुळे उद्योगक्षेत्रात पहिल्यांदाच सादर केल्या जात असलेल्या अनेक गोष्टी या कंपनीने आणल्या. यामुळे आर्थिक सेवा क्षेत्रातील दिग्गज हे स्वतंत्रचे स्थान अधिक मजबूत झाले. श्रीमती बिर्ला या डिझाईनला सर्वाधिक महत्त्व देणारा होम डेकोर ब्रँड इकाई असाईच्या संस्थापिका आहेत. सामाजिक क्षेत्रात श्रीमती अनन्या बिर्ला या एम्पॉवरच्या सह-संस्थापिका आहेत. भारतात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला आहे. त्यांनी अनन्या बिर्ला फाऊंडेशन देखील सुरु केले आहेज्यामध्ये मानसिक आरोग्य व सामाजिक प्रभाव या क्षेत्रात संशोधन केले जाते.

आर्यमान विक्रम बिर्ला यांच्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांमध्ये उद्योजकताव्हीसी गुंतवणूक व व्यावसायिक खेळ यांचा समावेश आहे. आदित्य बिर्ला उद्योग समूहातील अनेक व्यवसायांमध्ये त्यांचा खूप जवळून सहभाग असतो. उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला यांच्या सल्ल्याने ते आधुनिक व्यवसायांमध्ये या समूहाच्या पदार्पणाला प्रोत्साहन देत आहेत. उद्योग समूहाचा डी२सी प्लॅटफॉर्म टीएमआरडब्ल्यूला इन्क्युबेट करण्यात श्री. आर्यमान यांनी मदत केली असून ते त्याच्या मंडळातील संचालक आहेत. उद्योग विश्वात त्यांनी पहिले पाऊल हॉस्पिटॅलिटी व्यवसायात ठेवले. आदित्य बिर्ला व्हेंचर्स या उद्योग समूहाच्या व्हेंचर कॅपिटल फंडचे नेतृत्व देखील श्री. आर्यमान करत आहेत. आदित्य बिर्ला उद्योग समूहात येण्याआधी आर्यमान हे एक उत्तम प्रथम श्रेणी क्रिकेटर होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...

लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील त्रिमूर्ती लॉन्स परिसरातील एका कंपनीला...

शेतकरी,बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार: रमेश चेन्नीथला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित...

लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;

पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला! पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील...