ओळख निसर्गाची या उपक्रमांतर्गत अनंतराव पवार अभियांत्रिकीची तळजाई टेकडीवर भ्रमंती……

Date:

पुणे-एखादी गोष्ट चार भिंतींमध्ये शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन शिकवली तर ती विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहते या उद्देशाने अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जैवविविधतेने परिपूर्ण अशा तळजाई टेकडीवर भ्रमंती केली. विद्यार्थ्यांनी  या उपक्रमा दरम्यान प्राकृतिक घटकातील डोंगर, विविध भूरूपे, मृदा, आल्हाददायक हवामान, खडक,जलप्रणाली,  औषधी वनस्पती, नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणातील विविध घटकांचे प्रत्यक्ष अवलोकन अशा जैवविविधतेच्या विविध घटकांचा  अनुभव  विद्यार्थ्यांनी घेतला. तलाव, समतल पातळीचे चर व त्यामुळे वाढणारा भूजल साठा, विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे वेगवेगळे आवाज, पक्षांच्या हालचालींचे निरीक्षण, सरपटणारे प्राणी व त्यांच्या हालचाली, दुर्मिळ प्रजातीची फुलपाखरे,फुलझाडे, रिमझिम पडणारा पाउस, धुके या गोष्टी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या. मेट्रो प्रकल्पांतर्गत  निसर्गाला अभियांत्रिकीची जोड  देऊन वृक्ष पुनर्रोपण प्रकल्पाचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या  २१५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महाविद्यालयाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

            या उपक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. बालाजी सेलूकर यांनी प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली केले.  ओळख निसर्गाची या उपक्रमामध्ये डॉ.गायत्री कांबळे,प्रा.सचिन यादव, प्रा. रणजीत गायकवाड, प्रा.अक्षदा गोगावले, प्रा.राजेश खरात, प्रा.योगिता कांबळे, प्रा.हर्षा अभिचंदानी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाने अशाप्रकारे ओळख निसर्गाची या उपक्रमाचे  आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...