सोलापूर: 25 जून 2015 रोजी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे अमेरिकेतील अलास्का येथे एका शिखराच्या मोहिमेवर असताना त्यांचे वडिल अशोक बनसोडे यांचे निधन झाले होते. त्यानंतर मणक्याच्या आजाराने अंथरुणावर खिळलेल्या आनंदने पुन्हा भरारी घेत अनेक शिखरे सर केली व बिजनेसमध्येही उत्तुंग भरारी मारली आहे. आनंद चे वडील अशोक बनसोडे हे २ चाकी गाड्यांचे चाक आउट व पंचर काढत होते. पंचशील प्रशालेतील सर्व विध्यार्थी हे अत्यंत गरीब परिस्थितीत असून त्या विध्यार्थ्यांना स्वप्नांचे पंख देण्यासाठी आनंदने या शाळेतील सर्व मुलांना पुस्तके भेट दिली. दि. 25 जून रोजी मजरेवाडी येथील आनंदचे शिक्षण झालेल्या पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत आनंदने स्वलिखित “स्टेपिंग स्टोन टू सक्सेस” व “स्वप्नपूर्तीचा खजिना” ही पुस्तके सर्व मुलांना भेट दिली. यावेळी पत्रकार व इको फ्रेंडली क्लब चे संस्थापक परशुराम कोकणे व संपादक व प्रकाशक विजय गायकवाड हे उपस्थित होते. 2016 मध्ये आनंदने स्टेपिंग स्टोन टू सक्सेस हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाने अनेकांना प्रेरणा दिली होती. “2015 साली आजच्याच दिवशी वडिलांच्या निधनामुळे मी सर्व गमावले होते. त्यावेळी माझ्याकडे फक्त स्वप्नांशिवाय काहीही नव्हते. ज्या दिवसाने माझाकडून सर्वकाही हिरावून घेतले त्याच दिवशी मी तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी ही पुस्तके देत आहे” असे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे म्हणाला. यावेळी परशुराम कोकणे व विजय गायकवाड यांनीही मुलासाठी प्रेरणादायी भाषण करून पंचशील शाळेतील मुलांसाठी इथून पुढे भरीव कामगिरी करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन श्री. कलशेट्टी सर यांनी केले तर श्री.चट्टे सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. यलगोंडे सर होते.